४,८२५ हेक्टर क्षेत्राला गारपिटीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 02:47 PM2020-03-20T14:47:38+5:302020-03-20T14:47:53+5:30

१७ आणि १८ मार्चच्या मध्यरात्री जिल्ह्यात वादळी वाºयासह धोधो अवकाळी पाऊस आणि गारपिट झाली

Hailstrom hit area of 4825 hectares | ४,८२५ हेक्टर क्षेत्राला गारपिटीचा फटका

४,८२५ हेक्टर क्षेत्राला गारपिटीचा फटका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात मंगळवार १७ मार्च आणि बुधवार १८ मार्चच्या मध्यरात्री वादळी वाऱ्यासह झालेला पाऊस आणि गारपिट झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे ५००८ शेतकऱ्यांच्या ४८२५.५ हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांसह भाजीपाला व फळपिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे.
वाशिम जिल्ह्यात यंदा रब्बी पिके आणि भाजीपाला मिळून १ लाख १ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकºयांनी लागवड केली होती. त्याशिवाय फळपिकांचेही क्षेत्र लक्षणीय होते. रब्बी हंगामातील ७० टक्क्यांवर गहू आणि हरभरा ही पिके काढणीवर असताना गत आठवड्यापासून अवकाळी पावसाचा फटका या पिकांना बसत आहे. त्यातच १७ आणि १८ मार्चच्या मध्यरात्री जिल्ह्यात वादळी वाºयासह धोधो अवकाळी पाऊस आणि गारपिट झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे तब्बल ५ हजार ८ शेतकºयांच्या ४ हजार ८२५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला. यात कारंजा तालुक्यात सर्वाधिक २ हजार ५६० शेतकºयांच्या २ हजार ४०८ हेक्टर, मंगरुळपीर तालुक्यातील १ हजार ४२४ शेतकºयांच्या १ हजार ६५ हेक्टर, वाशिम तालुक्यातील ७६६ शेतकºयांच्या १ हजार १६ हेक्टर, तर मालेगाव तालुक्यातील २५८ शेतकºयांच्या ३३६ हेक्टर क्षेत्रातील पिकांचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या पिकांत गहू, हरभरा, उन्हाळी भुईमुग, मका, कांदा, भाजीपाला, पपई, संत्रा, निंबू, सिताफळ आदि पिकांचा समावेश आहे. (विशेष पान २ वर)

Web Title: Hailstrom hit area of 4825 hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.