चिमुकल्यांचे पोट भरणाऱ्या स्वयंपाकीण बाईचं अर्धपोटी
By admin | Published: November 17, 2016 08:41 PM2016-11-17T20:41:54+5:302016-11-17T20:41:54+5:30
अंगणवाडी, शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजवून चिमुकल्यांचे ह्यपोटह्ण भरणाऱ्या स्वयंपाकीण बार्इंना सेवेत कायम नसल्याने रोजंदारीवर काम करुन अर्धपोटी राहण्याची वेळ आली आहे
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 17 : अंगणवाडी, शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजवून चिमुकल्यांचे पोट भरणाऱ्या स्वयंपाकीण बार्इंना सेवेत कायम नसल्याने रोजंदारीवर काम करुन अर्धपोटी राहण्याची वेळ आली आहे. जिल्हयातील अंगणवाडी, शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दयावा लागतो. यासाठी प्रत्येक ठिकाणी शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती करण्यात आलेल्या महिलांना मिळत असलेल्या मानधनातून त्यांचा उदरनिर्वाह होणे शक्य नसल्याने त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी त्यांनी नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनही केले मात्र याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिला आपल्या शालेय पोषण आहार शिजविणा-यांचा सेंट्रल किचन रद्द करून कार्यरत वैयक्तिक स्वयंपाकी, महिला किंवा पुरुष कामगार व बचत गट सदस्यांना सेवेत कायम करून शासकीय सेवेचे सर्व लाभ देण्यात यावेत, शालेय पोषण आहार अंतर्गत डाटा एन्ट्री आॅपरेटर यांचे दरमाह मानधन २० हजार रुपये करावे. तसेच, त्यांनाही सेवेत कायम करून वेतनश्रेणी लागू करण्यात यावी. याचबरोबर सर्व शासकीय सेवेचा लाभ देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणार आहेत.