जिल्हाभरातील एटीएममध्ये ठणठणाट 

By admin | Published: March 19, 2017 04:55 PM2017-03-19T16:55:52+5:302017-03-19T16:55:52+5:30

जिल्ह्यातील ९० टक्के एटीएममध्ये ठणठणाट आहे. विविध बँकांचे ६० वर एटीएम नागरीकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.  

Halted at ATMs across the district | जिल्हाभरातील एटीएममध्ये ठणठणाट 

जिल्हाभरातील एटीएममध्ये ठणठणाट 

Next

वाशिम: केंद्राच्या ह्यनोटाबंदीह्णनंतर विस्कळीत झालेले आर्र्थिक व्यवहार आता सुरळीत होत असताना मागील आठवड्यापासून बँकांना व्यवहारासाठी पुरेसा पैसा मिळेनासा झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ९० टक्के एटीएममध्ये ठणठणाट आहे. विविध बँकांचे ६० वर एटीएम नागरीकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.   बँकामधील गर्दी कमी होवून नागरिकांना एटीएम मधून रक्कम काढण्याची व्यवस्था बँेकामार्फत करण्यात आली. त्यासाठी जिल्ह्यातील विविध बँकांची ६२ एटीएम आहेत. गत आठवडाभरापासून निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तुटवड्यामुळे बँकामधून विड्रॉल मर्यादा कमी करण्यात आली. तर अनेक बँकांच्या एटीएममध्ये रक्कम टाकण्यात आली नसल्याने नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. शासनाच्या नोटबंदीच्या निर्णयानंतर एटीएम मधून रक्कम काढण्यासाठी असलेली मर्यादा वाढविण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. परंतु दुसरीकडे एटीएममध्ये रक्कमच नसल्याने एटीएम बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना आपल्या खात्यातून नोटाच काढता येवू नये याची खबरदारी घेतल्या गेल्याचे चित्र जिल्हाभरात दिसून येत आहे. मागील आठवड्यापासून जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर, कारंजा, रिसोड, मंगरूळपीर तथा मानोरा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहेत.  

Web Title: Halted at ATMs across the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.