स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सोमवारी हात धुवा मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 02:54 PM2018-10-13T14:54:11+5:302018-10-13T14:54:27+5:30
वाशिम - स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये १५ ऑक्टोबर रोजी जागतिक हात धुवा दिन साजरा करण्याचे आवाहन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये १५ ऑक्टोबर रोजी जागतिक हात धुवा दिन साजरा करण्याचे आवाहन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांनी केले. याबाबत सर्व गटविकास अधिकारी यांना लेखी पत्राद्वारे निर्देश देण्यात आले आहेत.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छतेच्या विविध उपक्रमांपैकी वैयक्तिक स्वच्छतेसाठी हात धुणे हा एक महत्वाचा भाग आहे . लोकांच्या स्वच्छतेबाबतच्या जाणिवा अधिक समृद्ध होऊन सुदृढ, निरोगी व आनंददायी जीवनासाठी जागतिक स्तरावर १५ ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक हात धुवा दिनासाठी आरोग्य संघटनेने 'क्लीन हॅन्ड - ए रिसिप फाॅर हेल्थ' हे ब्रीद वाक्य निश्चित केले आहे. हात धुवा दिनाच्या संकल्पनेला धरून अन्न स्वच्छता, हात धुण्याच्या महत्त्वाच्या वेळा विशेषत: जेवणापूर्वी, बाळाला भरविण्यापूर्वी, बाळाची शी धुतल्यानंतर आणि शौचाहुन आल्यानंतर साबणाने, हॅन्ड वाॅशने किंवा राखेने हात स्वच्छ धुवावेत असा संदेश देण्यात यावा असे निर्देश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र इत्यादी ठिकाणी जाणीव जागृती करण्यासाठी यापूर्वी शासनामार्फत पुरविण्यात आलेल्या अाय.ई.सी. टुल कीट चा वापर करावा असे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने इस्कापे यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.