हात धुवा दिन : विविध कार्यक्रमातून स्वच्छतेचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 04:39 PM2018-10-15T16:39:34+5:302018-10-15T16:39:54+5:30
वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय तसेच ग्राम पंचायतींमध्ये १५ आॅक्टोबर रोजी जागतिक हात धुवा दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय तसेच ग्राम पंचायतींमध्ये १५ आॅक्टोबर रोजी जागतिक हात धुवा दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत राबविण्यात येणाºया स्वच्छतेच्या विविध उपक्रमांपैकी वैयक्तिक स्वच्छतेसाठी हात धुणे हा एक महत्वाचा भाग आहे. लोकांच्या स्वच्छतेबाबतच्या जाणिवा अधिक समृद्ध होऊन सुदृढ, निरोगी व आनंददायी जीवनासाठी जागतिक स्तरावर १५ आॅक्टोबर हा दिवस दरवर्षी हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. १५ आॅक्टोबरला जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये स्वच्छताविषयक कार्यक्रम घेण्यात आले. निरोगी आरोग्यासाठी हात धुण्याच्या महत्वाच्या वेळा विशेषत: जेवणापूर्वी, बाळाला भरविण्यापूर्वी, बाळाची शी धुतल्यानंतर आणि शौचाहुन आल्यानंतर साबणाने, हॅन्ड वॉशने किंवा राखेने हात स्वच्छ धुवावेत, असा संदेश देण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनात व स्वच्छता कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांच्या नेतृत्त्वात ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता विषयक कार्यक्रम घेण्यात आले.