राज्यस्तरीस हॅण्डबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा समारोप; पुणे संघ विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 03:18 PM2018-11-19T15:18:38+5:302018-11-19T15:19:34+5:30
कारंजा लाड (वाशिम) : हॅण्डबॉल असोसिएशन महाराष्ट्र तथा दी हॅण्डबॉल असोसिएशन आॅफ वाशिम ड्रिस्ट्रिक यांच्यावतीने कारंजा येथील तालुका क्रीडा संकुलावर आयोजित राज्यस्तरीस हॅण्डबॉल अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याचा संघ विजयी ठरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड (वाशिम) : हॅण्डबॉल असोसिएशन महाराष्ट्र तथा दी हॅण्डबॉल असोसिएशन आॅफ वाशिम ड्रिस्ट्रिक यांच्यावतीने कारंजा येथील तालुका क्रीडा संकुलावर आयोजित राज्यस्तरीस हॅण्डबॉल अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याचा संघ विजयी ठरला आहे. वाशिमच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
१६ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा पार पडली असून, स्पर्धेत दूरवरून आलेल्या संघांनी सहभागी नोंदविला. पुणे संघाने प्रथम क्रमांक, संत गजानन महाराज हॅण्डबॉल क्लब तथा वाशिम संघाने द्वितीय क्रमांक, सोलापूर संघाने तृतिय तर कोल्हापूर संघाने चौथा क्रमांक मिळविला आहे. विजयी सर्व संघांना ट्रॉफी व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. वाशिम संघात उत्कृष्ट खेळी करणाºया साक्षी माटोळे व मोहिणी घाटे यंना वाशिम जिल्हा शिक्षक पतसंस्थेच्यावतीने प्रत्येकी पाच हजार रुपये रोख बक्षीस देण्यात आले. तसेच पुणे व वाशिम संघाला नितीन काळे, राजू मते, आर्य समाज कारंजा यांनी रोख बक्षिसे दिली. समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख, उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, शिक्षण व आरोग्य सभापती सुधीर पाटील गोळे, डॉ. यशवंत टेकाडे, विजय पाटील काळे, रणधीर सिंग, देवेंद्र चौगुले, रामभाऊ नवघरे, ठाणेदार गजानन गुल्हाणे, माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा, क्लबचे अध्यक्ष देवेंद्र ताथोड, गोपाल पाटील भोयर, राजू तायडे, सुभाष गावंडे, उमेश माहितकर, सुनील सुडके, प्राजक्ता माहितकर, शशिकांत नांदगावकर, मनोज कानकिरड, नीलेश टेकाडे आदींची उपस्थिती होती.
प्रास्ताविक क्लबचे सचिव राहुल गावंडे तर संचालन विवेक गहाणकरी, सनी राऊत यांनी केले.