मानोरा तहसील कार्यालयावर धडकला अपंगांचा आक्रोश मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 05:15 PM2018-11-28T17:15:49+5:302018-11-28T17:18:17+5:30
मानोरा : तालुक्यातील अपंग बांधवाच्या प्रलंबीत न्याय मागणीसाठी आधार स्वयंसेवीचे प्रमुख प्रा.जय चव्हाण यांच्या नेतृत्वात २८ नोव्हेंबरला मानोरा तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : तालुक्यातील अपंग बांधवाच्या प्रलंबीत न्याय मागणीसाठी आधार स्वयंसेवीचे प्रमुख प्रा.जय चव्हाण यांच्या नेतृत्वात २८ नोव्हेंबरला मानोरा तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. यावेळी प्रलंबीत वीस मागण्याचे निवेदन तहसीलदार डॉ.सुनिल चव्हाण यांना देण्यात आले.
मानोरा तालुक्यातील अपंग बांधवांच्या न्याय मागण्याचे निवेदन आधार स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख प्रा.जय चव्हाण शासनाकडे गेल्या एक वर्षापासुन देवून पाठपुरावा करीत आहेत. यासंदर्भात अपंगांच्या मागण्या मान्य न झाल्यास २८ नोव्हेंबरला आक्रोश मोर्चा काढणार असे निवेदनात नमुद केले होते. शासनाने दाखल न घेतल्यामुळे प्रा.जय चव्हाण यांच्या नेतृत्वात पंचायत समिती कार्यालयपासुन आक्रोश मोर्चाला सुरुवात करण्यात आली.
दिग्रस चौक ,पासुन मोर्चा तहसील कार्यालयावर आल्या नंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.जय चव्हाण होते तर प्रमुख उपस्थितीत बाळु आडे, अॅड. बाळु चव्हाण ,गजानन राठोड, रमेश नागापुरे, दिपक खडसे, गोपाल शर्मा, रवि धामंदे, संतोष राठोड, विनोद राठोड, रंगराव जाधव, अनिल राठोड, आदिंची उपस्थिती होती.
मोर्चाला संबोधीत करतांना प्रा.जय चव्हाण म्हणाले शासनाकडे गेल्या एक वर्षापासुन सतत पाठपुरावा करणे सुरु आहे, मात्र शासन अपंगाच्या मागण्याकडे जाणिव पुर्वक दुर्लक्ष करीत आहे.यावेळी मागण्याचा पाढाच चव्हाण यांनी उपस्थित समोर मांडुन शासनाला तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.प्रास्ताविक संचालन गोपाल शर्मा यांनी केले.यावेळी रमेश नागापुरे, काशीराम राठोड, संतोष ढळे, अॅड. बाळु चव्हाण, बाळु आडे, गजानन राठोड यांनी मोर्चाला संबोधीत केले.यावेळी अपंगांना विनाअटघरकुल मिळावे, तालुका स्तरावर मेळावा घेवुन अपंगांना प्रमाणपत्र द्यावे, मोफत गॅस जोडणी मिळावी, अंतोदय योजनेत सामावुन घ्यावे असे विस मागण्याचे निवेदन तहसीलदार डॉ. सुनिल चव्हाण यांना देण्यात आले.यावेळी महिलासह अपंग बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.