लोंबकळलेल्या तारा, झुकलेले खांब केले सरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:43 AM2021-04-01T04:43:28+5:302021-04-01T04:43:28+5:30
मालेगाव ते हिंगोली या ९७ किलोमीटर अंतराच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे. याअंतर्गत रस्त्यावरील वीज वाहिन्यांची शिफ्टिंग ...
मालेगाव ते हिंगोली या ९७ किलोमीटर अंतराच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम जवळपास संपण्याच्या मार्गावर आहे. याअंतर्गत रस्त्यावरील वीज वाहिन्यांची शिफ्टिंग केली जात आहे; परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. शिरपूरपासून दोन किलोमीटर अंतरावर उभारण्यात आलेले वीजखांब योग्यप्रकारे न लावल्याने झुकले होते. तेथील एक रोहित्रही उभारणी केल्यानंतर काहीच दिवसांत पूर्णत: जमिनीलगत झुकले. त्यास योग्य ताण देण्यात आला नाही. यामुळे जागोजागी विजेच्या तारा लोंबकळत होत्या. वाऱ्याचा थोडाही वेग वाढल्यास वीज तारांचे घर्षण होण्याच्या घटना वारंवार घडत होत्या. 'लोकमत'ने ३१ मार्चच्या अंकात या संदभार्त वृत्त प्रकाशित केले. त्याची त्वरित दखल घेत लोंबकळलेल्या तारांना ताण देण्यासह झुकलेले खांब सरळ करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. झुकलेले रोहित्रही सरळ करण्यात आल्याचे पाहावयास मिळाले.