मुख्य चौकात लोंबकळत्या तारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:26 AM2021-07-19T04:26:03+5:302021-07-19T04:26:03+5:30
------------------ काजळेश्वर परिसरात दमदार पावसाची प्रतिक्षा वाशिम: कारंजा तालुक्यातील काजळेश्वर परिसरातील पेरणी १०० टक्के आटोपली असताना परिसरात अद्यापही दमदार ...
------------------
काजळेश्वर परिसरात दमदार पावसाची प्रतिक्षा
वाशिम: कारंजा तालुक्यातील काजळेश्वर परिसरातील पेरणी १०० टक्के आटोपली असताना परिसरात अद्यापही दमदार पाऊस पडलेला नाही. त्यामुळे पिके संकटात सापडली आहेत. पिके सुकत असल्याने चिंताग्रस्त असलेल्या शेतकºयांना पावसाची प्रतिक्षा लागली आहे.
-------------
महावितरणची मान्सूनपूर्व कामे प्रलंबित
वाशिम: दरवर्षीप्रमाणे यंदाही महावितरणकडून मान्सूनपुर्व दुरूस्तीच्या कामास सुरूवात करण्यात आली. यातइंझोरी परिसरातील विज तारांवर चढलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्यासह इतरही विविध कामे करताना महावितरणचे कर्मचारी दिसून आले; परंतु अद्यापही ही कामे पूर्णत्वास गेली नाहीत.
----------
गावांतील पथदिवे दुरूस्तीची मागणी
वाशिम: यंदाचा पावसाळा सुरू होऊन महिना उलटला आहे. आता रात्रीच्या सुमारास विजेची अत्यावश्यकता भासते. ही बाब लक्षात घेवून खेडेगावांत बंद, नादुरूस्त असलेले पथदिवे विनाविलंब दुरूस्त करण्याची मागणी होत आहे.
===============
ई-क्लास जमिनीवर अतिक्रमण
वाशिम: मंगरुळपीर तालुक्यात आसेगाव येथील ई-क्लास जमिनीवर अतिक्रमण केले आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही दखल घेण्यात येत नसून, दिवसेंदिवस अतिक्रमण वाढतच आहे.
------------------------