आजपासून वाशिममध्ये हरी व्याख्यानमाला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:40 AM2021-02-10T04:40:04+5:302021-02-10T04:40:04+5:30
हरिभाऊ प्रतिष्ठानतर्फे आयोजित या व्याख्यानमालेने यावर्षी एकविसाव्या वर्षात पदार्पण केले आहे. विनोदी लेखक नरेंद्र इंगळे (अकोट) हे व्याख्यानमालेचे ...
हरिभाऊ प्रतिष्ठानतर्फे आयोजित या व्याख्यानमालेने यावर्षी एकविसाव्या वर्षात पदार्पण केले आहे. विनोदी लेखक नरेंद्र इंगळे (अकोट) हे व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफणार आहेत. १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता ते ‘विनोद : एक जीवन ऊर्जा’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता बुलडाणा येथील प्राचार्य गोविंद गायकी ‘हसत-खेळत कविता!’ हा विषय फुलवतील. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक डॉ. सदानंद देशमुख उपस्थित राहणार आहेत. या व्याख्यानमालेचा लाभ घेण्याचे आवाहन हरिभाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सुभाष जाधव, सचिव डॉ. के. बी. देशमुख यांच्यासह कार्यकारी मंडळाने केले आहे.
दरम्यान, विदर्भ साहित्य संघ शाखा वाशिमतर्फे स्व. द. चिं. सोमण स्मृती व्याख्यानमाला दरवर्षी घेण्यात येते. यंदा या व्याख्यानमालेचे आठवे वर्ष असून, शुक्रवार, १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता पैठण येथील व्याख्यात्या डॉ. ऊर्मिला चाकूरकर या ‘जीवन एक प्रवास’ हा विषय मांडणार आहेत.