हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी दिला विजेचा वापर काटकसरीने करण्याचा संदेश !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 05:41 PM2019-03-29T17:41:45+5:302019-03-29T17:42:27+5:30
वाशिम : विजेचा वापर काटकसरीने करण्याचा संदेश स्थानिक एस.एम.सी.इंग्लिश स्कूलच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी, जागतिक वसुंधरा घटिका दिनाच्या पूर्वसंध्येला अर्थात २९ मार्च रोजी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : विजेचा वापर काटकसरीने करण्याचा संदेश स्थानिक एस.एम.सी.इंग्लिश स्कूलच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी, जागतिक वसुंधरा घटिका दिनाच्या पूर्वसंध्येला अर्थात २९ मार्च रोजी दिला.
वसुंधरा घटिका हा एक वार्षिक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम असुन जागतिक तापमान वाढिच्या विरोधात चाललेल्या चळवळीचे ते एक प्रतिक आहे. सन २००८ मध्ये जागतिक स्तरावर वसुंधरा घटिका प्रथमच साजरी करण्यात अली. मार्च महिण्याच्या शेवटच्या शनिवारी वसुंधरा घटिका साजरी करण्यात येते. या अंतर्गत उपरोक्त दिवशी रात्री ८:३० ते ९:३० या कालावधी मध्ये घराघरातून व उद्योग समुहातुन वीज वापरणाºया सर्व व्यक्तींना आवाहन करण्यात येते की. जरूरी नसलेले दिवे व विजेवर चारणारे सर्व उपकरणे या वेळेत बंद ठेवावेत म्हणजेच मोठ्या प्रमाणावर विजेच्या वापरात बचत होईल . यामध्ये प्रामुख्याने उद्योग समुहांना तसेच व्यावसायीकांना त्यांचा विजेचा वापर या कालावधी मध्ये कमी करावा व विजेची उपकरणे बंद ठेवावी अशी माफक अपेक्षा बाळगली जाते. या दृष्टिकोनातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्थानिक एस.एम.सी.इंग्लिश स्कूलच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी २९ मार्च रोजी कार्यक्रम घेऊन विजेचा वापर का़टकसरीने करण्याचा सल्ला दिला आहे. पर्यावरणविषयक या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्राचार्य मीना उबगडे व राष्ट्रीय हरीत सेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांनी केले. यावेळी शिक्षिका भाग्यश्री ठोके, राष्ट्रीय हरितसेनेचे चिमुकले अनुष्का जैस्वाल, दिव्या मुठाळ, वैष्णवी उखळे, स्वरूपा सुरोशे, विश्वजा देशमुख, पार्थ पुंड, स्नेहल लांडकर , सृष्टि गायकवाड , मानसी इंगळे , खुशी चौधरी, मेघना शर्मा ,रूद्राकश बोरकर ,कृष्णाली ईढोळे , श्रद्धा धुत, नेहिका गुप्ता, प्रियंका शिरसाठ, सरगम सोनोने,साहिल राउत आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन व संचालन राष्ट्रीय हरीत सेनेचे शिक्षक अभिजीत जोशी यांनी केले.