संगणक साहित्य खरेदीतही अपहार झाल्याचा ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 05:00 PM2020-11-23T17:00:39+5:302020-11-23T17:00:46+5:30

Washim News १ लाख ५६ हजार २२० रूपयाचा अपहार केल्याचा ठपका उपविभागीय अधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालात ठेवण्यात आला.

He was also accused of embezzling computer equipment | संगणक साहित्य खरेदीतही अपहार झाल्याचा ठपका

संगणक साहित्य खरेदीतही अपहार झाल्याचा ठपका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मंगरूळपीर तहसिल कार्यालयातील गैरप्रकार व अपहाराची नवनवीन प्रकरणे चाैकशी अहवालातून उघडकीस येत आहेत. सुरूवातीला अतिवृष्टी अर्थसहाय्य निधीचा अपहार, त्यानंतर बीएलओंच्या मानधनात गैरप्रकार आदी प्रकार ताजे असतानाच यामध्ये आणखी एकाची भर पडली. संगणक साहित्याची खरेदी कागदोपत्री दर्शवुन १ लाख ५६ हजार २२० रूपयाचा अपहार केल्याचा ठपका उपविभागीय अधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालात ठेवण्यात आला.
मंगरूळपीर तालुक्यात सन २०१९ मध्ये अवेळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसान भरपाईपोटी लाखो रूपयाची रक्कम भुमिहिनांच्या खात्यात जमा केल्याचे उघडकीस आले. हा तपास सुरू असतानाच बीएलओच्या नावाखाली १ लाख ९२ हजाराचे मानधन अपात्र कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केल्याचे आढळुन आले. या दोन अपहाराच्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना उपविभागीय अधिकारी पदाचा प्रभार असताना किशोर बागडे यांनी संगणक व ईतर साहित्य खरेदी केल्याचे कागदोपत्री दर्शवुन १ लाख ५६ हजार २२० रूपयाचा अपहार केल्याचे चौकशीतून उघडकीस आले. याशिवाय संजय गांधी योजना, श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांचे आर्थिक सहाय्य जवळपास दहा महिने थांबवुन ठेवले. शासनाचे धोरणापासुन लाभार्थ्यांना वेळोवेळी लाभ दिला नसल्याचेही चौकशी अहवालातून उघडकीस आले आहे. या व अशा बहुतांश लाभाच्या योजनेमध्ये बागडे यांनी तहसिलदार या पदाचा गैरवापर केल्याचे दिसुन येत असल्याचा ठपका तपास अधिकारी जयंत देशपांडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तपास अहवालात ठेवला आहे. किशोर बागडे यांची ही कार्यपध्दती शासकीय अधिकाºयांचे कर्तव्यपालनासाठी घालुन दिलेल्या शिस्त, वर्तणुक व वित्तीय औचित्यांचा भंग झाल्याचे आढळुन येत आहे.बागडे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून केलेल्या अपहाराचे आर्थीक अंकेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. आर्थीक अंकेक्षणचा अहवाल आल्यानंतर अपहार प्रकरणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या अधिकारी व कर्मचाºयांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.

Web Title: He was also accused of embezzling computer equipment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.