फुलउमरी गावात आरोग्यविषयक जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:39 IST2021-04-25T04:39:42+5:302021-04-25T04:39:42+5:30

मानोरा तालुक्यातील फुलउमरी हे पाच हजार लोकवस्तीचे असलेले गाव. इतर गावाच्या तुलनेने येथे कोरोना रुग्णाची संख्या नगण्य आहे. तरी ...

Health awareness in Phulumari village | फुलउमरी गावात आरोग्यविषयक जनजागृती

फुलउमरी गावात आरोग्यविषयक जनजागृती

मानोरा तालुक्यातील फुलउमरी हे पाच हजार लोकवस्तीचे असलेले गाव. इतर गावाच्या तुलनेने येथे कोरोना रुग्णाची संख्या नगण्य आहे. तरी पण प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी येथील परेश कृष्णराव राठोड यांनी ग्रामपंचायत ,जिल्हा परिषद, व शासनाच्या निधीची वाट न पाहता आमचे गाव आमची जबाबदारी या भावनेतून गावातील चारही वार्डात सॅनिटायझर फवारणी करून गावातील व्यापारी हॉटेल, किराणा, चक्की,मेडिकल स्टोअर्स,व्यावसायिकांना फेसशिल्डचे वाटप केले तर गावातील तीनशे नागरिकांना मास्कचे वाटप केले. यावेळी मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन, हात वारंवार धुणे आदीबाबत जनजागृती करण्यात आली. सर्दी, ताप, खोकला आदी कोरोनाविषयक लक्षणे दिसून येताच प्रत्येकाने कोरोना चाचणी करावी, असे आवाहन करण्यात आले. यावेळी परेश राठोड, सरपंच नंदाबाई बाळू शेलकर,उपसरपंच श्रावण कांबळे, पोलीस पाटील संजीवनी राठोड, सावन राठोड, बाळू शेलकर,अमित राठोड, रवी टवले आदी उपस्थित होते.

Web Title: Health awareness in Phulumari village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.