आरोग्याची काळजी घेणारे ग्रामीण रुग्णालयच ‘आजारी’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 08:06 PM2017-10-05T20:06:10+5:302017-10-05T20:06:52+5:30
वाशिम: तालुक्यातील तुलनेने मोठी ग्रामपंचायत आणि बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाºया अनसिंग येथील ग्रामीण रुग्णालयात हल्ली विविध समस्या ‘आ’ वासून उभ्या आहेत. रुग्णालय परिसरात सदैव वराहांचा मुक्त संचार असून सर्वत्र घाण साचली आहे. ग्रामीण नागरिकांच्या आरोग्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी असलेले हे रुग्णालयच ‘आजारी’ पडल्याचा सूर सर्वसामान्य नागरिकांमधून उमटत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

अनसिंगला नजिकची ३३ पेक्षा अधिक खेडी जोडल्या गेली आहेत. या सर्व गावांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी ग्रामीण रुग्णालयाला पार पाडावी लागते. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणांमुळे आरोग्य सुविधांचा पुरता बोजवारा उडाला असून स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर झाला आहे. रुग्णालय परिसरात ठिकठिकाणी साचून राहणारा कचरा, घाण, वराहांचा संचार, डासांचा प्रादुर्भाव आदी प्रतिकुल बाबींमुळे रुग्ण लवकर बरा होण्याऐवजी समस्या अधिकच वाढत असल्याचे दिसून येत आहे.