वाशिम तालुक्यात आरोग्य तपासणी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:27 AM2021-06-10T04:27:24+5:302021-06-10T04:27:24+5:30
-----------------------------कोरोना लसीकरण करण्याचे आवाहन वाशिम : कोरोना प्रतिबंधक लस ही पूर्णत: सुरक्षित आहे. कोणतीही शंका किंवा भीती न बाळगता, ...
-----------------------------कोरोना लसीकरण करण्याचे आवाहन
वाशिम : कोरोना प्रतिबंधक लस ही पूर्णत: सुरक्षित आहे. कोणतीही शंका किंवा भीती न बाळगता, तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने बुधवारी केले आहे.
----------------------------रोहित्र दुरुस्त करण्याची मागणी
वाशिम : मालेगाव तालुक्यातील शिरपूर, मेडशी, जऊळका रेल्वे परिसरातील काही विद्युत रोहित्र नादुरुस्त असल्याने गावकऱ्यांची गैरसोय होत आहे. आता पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्याने वीजपुरवठा सलग राहणे आवश्यक आहे. नादुरुस्त वीज रोहित्र बदलून देण्याची मागणी गावकऱ्यांनी बुधवारी केली.
----------------------------मालेगाव तालुक्यात एक रुग्ण आढळला
वाशिम : मालेगाव तालुक्यातील ताकतोडा येथील एका रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल ९ जून रोजी पॉझिटिव्ह आला आहे. बुधवारच्या अहवालानुसार मालेगाव शहरात एकही रुग्ण आढळून आला नाही.
-------------------------------अतिक्रमणाचे प्रस्ताव नियमानुकूल करा !
वाशिम : जिल्ह्यातील अनसिंगसह इतर भागातील निवासी अतिक्रमणाचे प्रस्ताव नियमानुकूल नसल्याने अडचणी उद्भवल्या आहेत. हे प्रस्ताव नियमानुकूल करावे, अशी मागणी मानवी हक्क सुरक्षा दलाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी केली.