देपूळ परिसरात आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:37 AM2021-05-22T04:37:15+5:302021-05-22T04:37:15+5:30

देपूळ : वाशिम तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला असून, देपूळ परिसरातील ...

Health check up in Depul area | देपूळ परिसरात आरोग्य तपासणी

देपूळ परिसरात आरोग्य तपासणी

Next

देपूळ : वाशिम तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला असून, देपूळ परिसरातील गावांमध्ये घरोघरी फिरून आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे.

000000000

वाहनांअभावी रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय

वाशिम : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी एस. टी. बसचा प्रवास गेल्या काही दिवसांपासून बंद करण्यात आला आहे. यासह खासगी वाहनांनाही प्रवासाला परवानगी नाकारल्याने ग्रामीण भागातील रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय होत आहे.

000000000000

विनामास्क नागरिकांवर कारवाई

वाशिम : तालुक्यातील अनसिंग येथे पोलीस पथकाकडून सातत्याने कारवाया सुरू आहेत. याअंतर्गत शुक्रवारी ठाणेदार नयना पोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली.

0000000000

घरकुलांची कामे अपूर्ण; लाभार्थी हैराण

कारंजा लाड : शासनाकडून घरकुल मंजूर झालेल्या काही लाभार्थींच्या कागदपत्रांमधील त्रुटी दूर होऊनही कारंजा तालुक्यातील २०८ घरकुलांची कामे अपूर्ण राहिली आहेत. यामुळे लाभार्थी हैराण झाले आहेत.

000000000000000

फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम पायदळी

मानोरा : कोरोनाचे संकट अद्याप पूर्णत: निवळलेले नाही. असे असताना फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम पायदळी तुडविला जात आहे. बाजारपेठेत शुक्रवारी झालेल्या गर्दीत अनेकांनी हा नियम पाळला नसल्याचे दिसून आले.

00000000000000

मानोरा तालुक्यातील इंटरनेट सेवा ठप्प

मानोरा : भारत नेट योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींना हायस्पीड इंटरनेट सेवा पुरविण्याचे शासनाचे आदेश आहेत; मात्र, इंटरनेट जोडणीची कामे संथ गतीने सुरू असल्याने ग्रामीण भागातील इंटरनेट सेवा अद्याप ठप्पच आहे.

000000000000

किराणा साहित्याच्या दरामध्ये वाढ

जऊळका रेल्वे : गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाचे दर सातत्याने वधारण्यासोबतच अन्य स्वरूपातील किराणा साहित्याच्या दरातही वाढ झाल्याचे दिसत आहे

000000000000

वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

कामरगाव : ट्रिपल सीट यासह वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम राबविली जात आहे. कारंजा तालुक्यातील वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

000000000000000

पोलिसांकडून वाहनांची तपासणी

वाशिम : वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर दुचाकी, चारचाकी वाहनांची जिल्हा वाहतूक विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी कसून तपासणी करण्यात आली.

0000000000000

पाणीटंचाई निवारणासाठी ग्रा.पं.कडून नियोजन

कामरगाव : यापुढील काही दिवसांत गावात पाणीटंचाई जाणवणार असल्याचे गृहीत धरून स्थानिक ग्रामपंचायतीने पाणीटंचाई निवारणासाठी चोख नियोजन करणे सुरू केले आहे.

000000000000000

भाजीपाला पिकांचे नुकसान

मानोरा : वन्यप्राण्यांनी हैदोस घातल्याने भाजीपालावर्गीय पिकांचे नुकसान होत आहे. गतवर्षी अगोदरच पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. वन्यप्राणीदेखील भाजीपालावर्गीय पिकांची नासाडी करत आहे.

00000000000000

प्लास्टिक कचऱ्याने गुरांचे आरोग्य धोक्यात

रिसोड : प्लास्टिक पिशव्यांच्या विक्री व वापरावर निर्बंध लादण्यात आले आहेत. ठिकठिकाणी साचत असलेला प्लास्टिक कचरा सेवनाने मोकाट गुरांचे आरोग्य धोक्यात सापडत आहे.

Web Title: Health check up in Depul area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.