आठ हजार नागरिकांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:41 AM2021-04-21T04:41:11+5:302021-04-21T04:41:11+5:30
००० प्राथमिक आरोग्य केंद्रातील पदे रिक्त वाशिम : मालेगाव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत येणाºया काही प्राथमिक आरोग्य केंद्रातील पदे ...
०००
प्राथमिक आरोग्य केंद्रातील पदे रिक्त
वाशिम : मालेगाव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत येणाºया काही प्राथमिक आरोग्य केंद्रातील पदे रिक्त असल्यामुळे सेवा पुरविण्यात अडचणी येत आहे. रिक्त पदे भरण्यात यावे, अशी मागणी डही येथील ग्रा.पं. सदस्य रमेश अवचार यांनी मंगळवारी केली.
00
दुर्धर आजारग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा
वाशिम : हृदयरोग, किडनी व कर्करोग आदी दुर्धर आजाराने पीडित लाभार्थ्यांना औषधोपचाराकरीता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्रत्येकी १५ हजाराचे अर्थसहाय्य दिले जाते. सन २०२१ मध्ये प्रस्ताव सादर केलेल्यांना मदतीची प्रतिक्षा आहे.
००
रिसोड तालु्क्यात विद्युत पुरवठा खंडित
वाशिम : रिसोड तालुक्यातील अनेक गावांमध्ये वारंवार विदयुत पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात संबधितांना सूचना देऊनही कोणीच दखल घेत नसल्याने ग्रामस्थांमध्ये रोष व्यकत केल्या जात आहे.
००
स्मशानभूमींसाठी निधीची प्रतीक्षा
वाशिम : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अतिरिक्त निधी मिळाल्यास स्मशानभूमी, ग्रामपंचायत भवनाचा प्रश्न निकाली निघणार आहे. १५ कोटींचा अतिरिक्त निधी अद्याप मिळाला नाही. निधी केव्हा मिळणार, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.
०००
तिबल सीट प्रवास; दंडात्मक कारवाई
वाशिम : दुचाकीवरून तिबल सीट प्रवास करणाऱ्या जवळपास ५९ जणांवर गत दोन दिवसांत मालेगाव पोलीस स्टेशन व जिल्हा वाहतूक शाखेच्या चमूने दंडात्मक कारवाई केली.
००
सिंचन विहिरींची कामे रखडली
वाशिम: पंचायत समिती वाशिम अंतर्गत रोहयोतील सिंचन विहिरींच्या प्रस्तावांची संख्या वाढत असून, या प्रस्तावांची तात्काळ पडताळणी करून मंजुरी दिली जात आहे. त्यात आजवर २८ प्रस्ताव निकाली निघाले. मात्र, कोरोनामुळे कामे रखडली.
००
पीक नुकसानाचे पंचनामे करा
वाशिम : चार दिवसांपूर्वी झालेल्या वादळवाऱ्यामुळे काही ठिकाणी हळद, फळबाग, आंबा आदीचे नुकसान झाले. नुकसानाचे पंचनामे अद्यापही करण्यात आले नाही. पंचनामे करण्यात यावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
००
अनसिंग परिसरातील रस्त्यांची दुरावस्था
वाशिम : तोंडगाव परिसरातील रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने नागरिकांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. संबधितांनी लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
००
जऊळका येथे ग्रामस्थांची तपासणी
वाशिम : जऊळका गावात मंगळवारी आणखी दोन जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने आरोग्य विभागातर्फे गावातील नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. नागरिकांनी तपासणी करून घेण्याचे आवाहनही केले जात आहे.
००