मालेगाव तालुक्यात आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:28 AM2021-06-11T04:28:03+5:302021-06-11T04:28:03+5:30
०००००००००००००० तोंडगाव परिसरात रिक्त पदांचे ग्रहण वाशिम : तोंडगाव जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये महसूल, पंचायत, शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन यासह ...
००००००००००००००
तोंडगाव परिसरात रिक्त पदांचे ग्रहण
वाशिम : तोंडगाव जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये महसूल, पंचायत, शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन यासह विविध विभागातील कर्मचाऱ्यांची १० ते १२ पदे रिक्त आहेत. यामुळे कामकाज प्रभावित होत असल्याचे दिसून येते.
०००००
शैक्षणिक शुल्कात सवलत द्या
वाशिम : कोरोनामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया प्रभावित झालेली आहे. त्यामुळे शाळेतील प्रत्यक्ष शिक्षण बंदच होते. आता शिक्षण शुल्कासाठी शाळांचा तगादा सुरू झाला. त्यामुळे शैक्षणिक शुल्कात सवलत देण्याची मागणी पालकांनी गुरूवारी केली.
०००००
गोभणी येथे आरोग्य जनजागृती
वाशिम : गोभणी, कुकसा येथे गुरूवारी आणखी प्रत्येकी एक कोरोना रुग्ण आढळून आला. नागरिकांनी कोणती दक्षता घ्यावी याबाबत आरोग्य विभागातर्फे नागरिकांना गुरूवारी मार्गदर्शन करण्यात आले.
००००
रोजगार सेवकांचे मानधन प्रलंबित
वाशिम : गत दोन महिन्यांपासून रिसोड तालुक्यातील रोजगार सेवकांचे मानधन प्रलंबित असल्याने आर्थिक संकट ओढावले आहे. प्रलंबित मानधन देण्याची मागणी रोजगार सेवक संघटनेने पंचायत समितीकडे केली.
००
‘केमोथेरपी’च्या सुविधेची प्रतीक्षाच
वाशिम : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्य शासनाने वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात केमोथेरपी युनिट करिता आवश्यक असलेल्या उपकरणांची खरेदी करण्यासाठी ३ लाख ४० हजार ३३५ रुपये खर्चास ८ ऑगस्ट २०१९ रोजी मान्यता दिली होती. अद्याप निधीची तरतूद नसल्याने ही सुविधा उपलब्ध होऊ शकली नाही.