पांगरी येथे आरोग्य तपासणी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:39 AM2021-08-29T04:39:42+5:302021-08-29T04:39:42+5:30
००००००००००००० आर्थिक मदत देण्याची मागणी वाशिम : कोरोना काळात लोककलावंतांना रोजगाराचे कोणतेही काम मिळाले नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह होण्यासाठी ...
०००००००००००००
आर्थिक मदत देण्याची मागणी
वाशिम : कोरोना काळात लोककलावंतांना रोजगाराचे कोणतेही काम मिळाले नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह होण्यासाठी शासनाने पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी लोककलावंतांनी शुक्रवारी केली.
०००००००००००००
स्वतंत्र कार्यालय देण्याची मागणी
वाशिम : तालुका कृषी अधिकारी कार्यालयही तसेच जिल्हा जलसंधारण, माती परिक्षण व मृद संधारण कार्यालयही भाड्याच्या जागेत आहे. सुविधायुक्त स्वतंत्र कार्यालय देण्याची मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे.
०००००
तुळस, अश्वगंधाच्या रोपांची मागणीत वाढ
वाशिम : रोगप्रतिकारकशक्ती वाढावी याकरिता तुळस, अश्वगंधा, गुळवेल यासह वनस्पती औषधींच्या रोपांना महत्त्व प्राप्त झाले आहे. या राेपांच्या मागणीत वाढ होत असल्याचे दिसून येते.
००००००
प्लास्टिकबंदीचा फज्जा
वाशिम : शहरी भागामध्ये बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर होऊ नये, यादृष्टीने कार्यवाही होत नसल्याचे दिसून येत आहे. प्लास्टिक पिशव्यांमध्ये साहित्य दिले जात असल्याने प्लास्टिकबंदीचा फज्जा उडत आहे.
०००००
डॉक्टरांची रिक्त पदे भरण्याची मागणी
वाशिम : जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयांसह ग्रामीण रुग्णालयात विविध वर्गांतील तज्ज्ञ डॉक्टरांची निम्मी पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्याची मागणी रिपाइं (आठवले गट) जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे यांनी शनिवारी केली.