तोंडगाव येथे आरोग्य तपासणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:42 AM2021-04-20T04:42:41+5:302021-04-20T04:42:41+5:30

000 जऊळका परिसरात वर्गखोल्या नादुरुस्त वाशिम : जऊळकासह मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या जवळपास २० वर्गखोल्या नादुरुस्त असल्याने या ...

Health check-up at Tondgaon! | तोंडगाव येथे आरोग्य तपासणी !

तोंडगाव येथे आरोग्य तपासणी !

Next

000

जऊळका परिसरात वर्गखोल्या नादुरुस्त

वाशिम : जऊळकासह मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या जवळपास २० वर्गखोल्या नादुरुस्त असल्याने या वर्गखोल्यांची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी करण्याची मागणी पालकांनी यापूर्वीही केली होती. अद्याप दुरुस्ती झाली नाही.

००००

अनसिंग परिसरात पाणीटंचाईचे सावट !

वाशिम : उन्हाळ्याला सुरुवात होत नाही; तेच अनसिंग परिसरातील गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट आहे. नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोेरे जावे लागत आहे. काहीजण शेतातील विहिरींवरून पाणी आणतात.

०००

तांदळी येथे आणखी ८ कोरोना रुग्ण

वाशिम : वाशिम तालुक्यातील तांदळी शेवई येथे आणखी आठजणांचा कोरोना चाचणी अहवाल १९ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने सोमवारी केले आहे.

००००

खड्डयांमुळे वाहनचालकांची गैरसोय !

वाशिम : मेडशी परिसरातील ग्रामीण भागातील रस्त्यांवरील खड्डयांची डागडुजी अद्याप केली नाही. रस्त्यावरील खड्डयांमुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देणे अपेक्षित आहे.

00000

उंबर्डा येथे एक कोरोना रुग्ण

वाशिम : कारंजा तालुक्यातील उंबर्डाबाजार येथे आणखी एकाचा कोरोना चाचणी अहवाल १९ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन आरोग्य विभागाने सोमवारी केले.

०००००

खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता; चालक त्रस्त

वाशिम : वाशिम शहरातील जुना रिसोड नाका, लाखाळाकडे जाणाऱ्या मार्गावर खड्डे पडल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. जुना रिसोड नाका येथे महामंडळाच्या बसेसला थांबा असून, नेमके याच ठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी वाहनचालकांनी सोमवारी केली.

Web Title: Health check-up at Tondgaon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.