दोन हजार नागरिकांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:43 AM2021-05-07T04:43:22+5:302021-05-07T04:43:22+5:30
००० प्राथमिक आरोग्य केंद्रातील पदे रिक्त वाशिम : रिसोड तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत येणा-या काही प्राथमिक आरोग्य केंद्रांतील पदे ...
०००
प्राथमिक आरोग्य केंद्रातील पदे रिक्त
वाशिम : रिसोड तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत येणा-या काही प्राथमिक आरोग्य केंद्रांतील पदे रिक्त असल्यामुळे सेवा पुरविण्यात अडचणी येत आहे. रिक्त पदे भरण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी बुधवारी केली आहे.
00
स्मशानभूमींसाठी निधीची प्रतीक्षा
वाशिम : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अतिरिक्त निधी मिळाल्यास स्मशानभूमी, ग्रामपंचायत भवनाचा प्रश्न निकाली निघणार आहे. १५ कोटींचा अतिरिक्त निधी केव्हा मिळणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे.
०००००
रिठद येथे आणखी पाच कोरोना रुग्ण
वाशिम : रिसोड तालुक्यातील रिठद येथे आणखी पाच जणांचा कोरोना चाचणी अहवाल ६ मे रोजी पॉझिटिव्ह आला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये काही अंशी चिंतेचे वातावरण आहे.
०००००
ट्रीपल सीट प्रवास; दंडात्मक कारवाई
वाशिम : दुचाकीवरून ट्रीपल सीट प्रवास करणाऱ्या जवळपास ५२ जणांवर गत दोन दिवसांत अनसिंग पोलीस स्टेशन व जिल्हा वाहतूक शाखेच्या चमूने दंडात्मक कारवाई केली आहे.
०००
शिरपूर परिसरात कोरोनाबाबत जागृती
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न म्हणून ग्रामपंचायत व आरोग्य विभागातर्फे शिरपूर परिसरात आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली. शिरपूर येथे आणखी १२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आला.
००००
रस्त्यावर पुन्हा फेरीवाले
वाशिम : वाशिम शहरातील सकाळी ९ ते ११ या वेळेत रस्त्यावर उभे राहून फेरीवाले हे मालाची विक्री करीत असल्याचे गुरुवारी दिसून आले. मध्यंतरी रस्त्यावर फेरीवाले राहत नव्हते. आता पुन्हा फेरीवाले हे रस्त्यावर, रस्त्यालगत उभे राहत असल्याचे दिसून येते.
०००००
रोहयोची कामे सुरू करा
वाशिम : शेतीचा हंगाम संपल्यामुळे रोजगारासाठी रोजगार हमी योजनेंंतर्गत कामे उपलब्ध होणे आवश्यक आहे. राजुरा परिसरात रोहयोची कामे ठप्प आहे. रोजगार मिळावा याकरिता रोजगार हमी योजनेंतर्गत कामे सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
०००
जऊळका येथे आणखी सहा रुग्ण
वाशिम : मालेगाव तालुक्यातील जऊळका येथे ६ मे रोजी आणखी ६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाने सर्वेक्षण केले असून, कोरोनाबाधित रुग्णांना कोविड केअर सेंटर येथे हलविण्यात आले आहे.
०००
सौरपंप योजना लागू करावी
वाशिम : सिंचनासाठी सौरपंपाची जोड मिळावी, याकरिता कृषी सौरपंप योजना राबविण्यात येत आहे. काही तांत्रिक कारणामुळे या योजनेत मालेगाव तालुक्याचा समावेश झाला नाही. या योजनेत मालेगाव तालुक्याचा समावेश करण्याची मागणी शेतक-यांनी बुधवारी केली.
००००००
ब्लिचिंग पावडरचा अनियमित वापर
वाशिम : हराळ जिल्हा परिषद गटातील काही ग्रामपंचायती जलकुंभात ब्लिचिंग पावडरचा वापर नियमित करीत नसल्याचे दिसून येते. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने दूषित पाणीपुरवठा होऊ नये म्हणून पाण्यात ब्लिचिंग पावडरचा नियमित वापर करणे गरजेचे आहे.