दोन हजार नागरिकांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:42 AM2021-05-13T04:42:09+5:302021-05-13T04:42:09+5:30
००० शिरपूर आरोग्य केंद्रातील पदे रिक्त वाशिम : मालेगाव तालुक्यातील शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची काही पदे ...
०००
शिरपूर आरोग्य केंद्रातील पदे रिक्त
वाशिम : मालेगाव तालुक्यातील शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची काही पदे रिक्त आहेत. काही ठिकाणी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने रिक्त पदे भरण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
00
प्रोत्साहन अनुदानाची प्रतीक्षाच
वाशिम : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रोत्साहन अनुदान अद्याप दिले नाही. प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी मंगळवारी केली. राज्य शासनाने घोषणेची अमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.
000
अनसिंग येथे आणखी ५ कोरोना रुग्ण
वाशिम : वाशिम तालुक्यातील अनसिंग येथे आणखी ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण १२ मे रोजी आढळून आले. यापूर्वीही अनसिंग येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
00
००००००
तोंडगाव परिसरात अवैध वृृक्षतोड
वाशिम : तोंडगाव परिसरात आडजात वृक्षांची विनापरवाना कत्तल होत आहे. पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धनावर भर दिला जात आहे, तर दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या वृक्षांवर वन तस्करांकडून कुऱ्हाड चालविली जात आहे.
0000
किन्हीराजा येथे एक कोरोना रुग्ण
वाशिम : मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथे आणखी एका जणाचा कोरोना चाचणी अहवाल १२ मे रोजी पॉझिटिव्ह आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील काही जणांची माहिती संकलित करण्यात आली.
००००
विनामास्क आढळून आल्याने कारवाई
वाशिम : दुचाकीवर विनामास्क आढळून येणाऱ्या २६ जणांवर बुधवारी शहर वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाइ केली. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाहनचालकांनी मास्क किंवा रुमालचा वापर करावा, अशा सूचना दिल्या.
००००
रोहयोंतर्गतची कामे अपूर्ण
वाशिम : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेंतर्गतची मेडशी, राजुरा, शिरपूर परिसरात अनेक कामे अर्धवट आहे. मजुरांना कामे उपलब्ध व्हावी, म्हणून अर्धवट असलेली कामे सुरू करावी, अशी मागणी मजुरांनी केली.
00
ज्येष्ठांनी तातडीने चाचणी करावी!
वाशिम : ज्येष्ठ नागरिकांना कोरोना संसर्गाची लागण लवकर होते. त्यामुळे लक्षणे असल्यास त्यांनी तातडीने कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोेग्य अधिकारी डॉ.अविनाश आहेर यांनी केले आहे.
००००००
खिर्डा येथे जनजागृती
वाशिम : खिर्डा ता.मालेगाव येथे आणखी १४ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे बुधवारी निष्पन्न झाले. कोरोनाबाबत ग्रामपंचायतींद्वारे जनजागृती केली जात आहे. नागरिकांनी कुठेही गर्दी करू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले.