कोरोना विषाणूबाबत आरोग्य विभाग सज्ज - डॉ. अविनाश आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 04:18 PM2020-05-16T16:18:56+5:302020-05-16T16:19:44+5:30

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद...

Health department ready for corona virus - Dr. Avinash Aher | कोरोना विषाणूबाबत आरोग्य विभाग सज्ज - डॉ. अविनाश आहेर

कोरोना विषाणूबाबत आरोग्य विभाग सज्ज - डॉ. अविनाश आहेर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर प्रत्येक जण सावधगिरी म्हणून दक्षता घेत आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे ग्रामीण भागात कोणकोणत्या उपाय योजना राबविण्यात येत आहेत यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद...

कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात काय सांगाल?
-कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दी टाळणे आणि प्रत्येकाने खबरदारी घेणे हा एकमेव उपाय आहे. केंद्र व राज्य सरकारने अंमलात आणलेल्या उपाययोजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. प्रत्येकाने कोरोना विषाणू संसर्गाला गांभीर्याने घेऊन ‘लॉकडाउन’च्या काळात घरातच राहणे आवश्यक आहे.


जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा कशी आहे?
-जिल्हयात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांत पुरेशा प्रमाणात औषधीसाठा उपलब्ध करण्यात आला आहे. सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे आढळून येणाºया रुग्णांवर स्वतंत्र उपचार व्हावे आणि सहाही तालुकास्तरावर ‘कोविड केअर सेंटर’ स्थापन करण्यात आलेले आहेत. आशा स्वयंसेविका ९७६, गट प्रवर्तक ४८, अंगणवाडी सेविका १०७६, आरोग्य सेवक व सेविका १६५४, वैद्यकीय अधिकारी ३५० अशी चमू आरोग्य सेवा पोहचविण्यासाठी कार्यरत आहे.


कोरोनासंदर्भात कोणती दक्षता घ्यावी?
-कोरोनासंदर्भात दक्षता घेणे हाच सध्या तरी एकमेव उपाय आहे. गर्दीत जाणे टाळावे, चेहºयावर रुमाल किंवा मास्क लावणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करावे आदी दक्षता घेणे आवश्यक आहे.


आरोग्य अधिकारी, कर्मचाºयांसाठी संरक्षक किट आहेत का?
-आवश्यकता असणाºया अधिकारी, कर्मचाºयांना पीपीई व अन्य संरक्षक किट देण्यात आली आहे. अन्य कर्मचाºयांना मास्क व अन्य साहित्याचे वाटप केले आहे.


परजिल्ह्यातून येणाºया मजुरांबाबत काय सांगाल?
-परराज्य तसेच परजिल्ह्यातून मजूर, कामगार जिल्ह्यात येत आहेत. या सर्वांची आरोग्य तपासणी केली जात आहे. आरोग्य तपासणीनंतर त्यांना १४ दिवस ‘होम क्वारंटीन’ करण्यात येते. होम क्वारंटीन असणाºया नागरिकांवर त्या, त्या गावातील पोलीस पाटील, सरपंच, ग्रामदक्षता समिती, आरोग्य कर्मचाºयांमार्फत लक्ष ठेवले जात आहे. परजिल्ह्यातून येणाºया नागरिकांनीदेखील स्वत:हून आरोग्य तपासणी करावी.

Web Title: Health department ready for corona virus - Dr. Avinash Aher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.