आरोग्य विभागाने सर्व डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र मागविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 11:13 AM2021-08-29T11:13:39+5:302021-08-29T11:13:51+5:30

Health department seeks medical certificates from all doctors : बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले असून, प्रत्यक्षात काय कारवाई होणार? याकडे लक्ष लागून आहे.

Health department seeks medical certificates from all doctors! | आरोग्य विभागाने सर्व डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र मागविले!

आरोग्य विभागाने सर्व डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र मागविले!

Next

- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या सर्व डॉक्टरांकडून आरोग्य विभागाने वैद्यकीय प्रमाणपत्र मागविले आहे. यामुळे बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले असून, प्रत्यक्षात काय कारवाई होणार? याकडे लक्ष लागून आहे. बोगस डॉक्टरसंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले, हे विशेष.
वाशिम शहरातील रमेश टॉकीज परिसरातील एका दवाखान्यात विलास ठाकरे नामक बोसग डॉक्टरकडून अवैध गर्भपाताचा प्रयत्न झाल्याने आरोग्य क्षेत्र ढवळून निघाले. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून याकडे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाचे लक्ष वेधले. याची दखल घेत जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले. त्यानुसार  वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या सर्व डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र मागविण्यात आले आहेत. 

बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांच्या निर्देशानुसार तालुकास्तरीय समित्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या. वैद्यकीय व्यवसाय करणाºया डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र मागविण्यात आले आहेत. या प्रमाणपत्रांची पडताळणी केल्यानंतर दोषी आढळून येणाºयांवर नियमानुसार कारवाई केली जाईल.
-  डॉ. अविनाश आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम

Web Title: Health department seeks medical certificates from all doctors!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.