आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयाची सक्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 02:00 PM2018-06-24T14:00:34+5:302018-06-24T14:03:53+5:30

वाशिम: आरोग्य विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाºयांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन करून वरिष्ठांची पूर्व परवानगी न घेता मुख्यालय सोडणाऱ्या किंवा अनुपस्थित राहणाऱ्याअधिकारी, कर्मचाऱ्यांवर या पुढे शिस्तभंगासह कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

 Health officials, employees are forced to headquarters! | आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयाची सक्ती!

आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयाची सक्ती!

googlenewsNext
ठळक मुद्देअधिकारी, कर्मचारी कार्यालयीन दिवशी विहित वेळेत कार्यालयात उपस्थित राहत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. ही बाब कार्यालयीन शिस्तपालन आणि कार्यक्षम प्रशासनाच्या दृष्टीने गंभीर आहे. या गैरवर्तणुकीला आळा घालण्यासाठी शासनाने कठोर भूमिका घेतली आहे.


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: आरोग्य विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाºयांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन करून वरिष्ठांची पूर्व परवानगी न घेता मुख्यालय सोडणाऱ्या किंवा अनुपस्थित राहणाऱ्याअधिकारी, कर्मचाऱ्यांवर या पुढे शिस्तभंगासह कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
आरोग्य विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन दिवशी विहित वेळेत कार्यालयात उपस्थित राहत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले असून, अनुपस्थितीबाबत वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेत नाहीत किंवा पूर्वकल्पनाही देत नाहीत, तसेच मुख्यालय सोडताना किंवा दौºयासाठी जातानाही वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेत नाहीत. ही बाब कार्यालयीन शिस्तपालन आणि कार्यक्षम प्रशासनाच्या दृष्टीने गंभीर आहे. या गैरवर्तणुकीला आळा घालण्यासाठी शासनाने कठोर भूमिका घेतली असून, यापुढे क्षेत्रीय स्तरावर उप-संचालक, जिल्हा शल्यचिकित्सक यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्वच कार्यालयातील मुख्यालयात विना अनुमती अनुपस्थित राहणाºया, मुख्यालयी वास्तव्यास न राहणाºया अधिकारी, कर्मचाºयांची माहिती संकलित करून ती आरोग्य सेवा संचलनालयास कळवावी लागणार आहे. ही माहिती प्राप्त झाल्यानंतर आरोग्य संचालनालय प्रथमत: संबंधित अधिकारी, कर्मचाºयांना मुख्यालयी उपस्थित राहण्यास, वास्तव्यास राहण्याबाबत सूचना देऊन त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करणार आहे. त्याशिवाय विनाअनुमती कार्यालयात गैरहजर राहिल्यास, विनाअनुमती मुख्यालय सोडून गेल्यास अशा अधिकारी, कर्मचाºयांविरुद्ध निलंबन, शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असून, त्यासाठी त्यांची नावे नियुक्ती अधिकाºयांना कळविली जाणार आहेत. नियुक्ती अधिकाºयांना अशी नावे प्राप्त झाल्यानंतर गैरवर्तणुकीच्या बाबी अन्यप्रकारे त्यांच्या निदर्शनास आल्यापासून महिनाभराच्या आत कसूरदार अधिकारी, कर्मचाºयांना निलंबित करून शिस्तभंगाची कार्यवाही सुरू करणार आहेत. शासनाच्या आरोग्य विभागाने घेतलेल्या या भूमिकेमुळे आरोग्य विभागातील कर्मचाºयांच्या अनुपस्थितीबाबतच्या मनमानी प्रकाराला आळा बसून, गोरगरीब रुग्णांना वेळेत आरोग्य सेवा मिळणे शक्य होणार आहे.


पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडणाºया किंवा विहित वेळेत उपस्थित न राहणाºया अधिकारी, कर्मचाºयांवर निलंबन आणि शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबतच्या सूचना आहेत. वरिष्ठ स्तरावरील निर्देशानुसार याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
-ए. व्ही. सोनटक्के, जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम.

Web Title:  Health officials, employees are forced to headquarters!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम