आरोग्याशी निगडित खाद्यान्न सुरक्षा चव्हाट्यावर!

By admin | Published: January 20, 2017 02:13 AM2017-01-20T02:13:16+5:302017-01-20T02:13:16+5:30

ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकांना ‘कोलदांडा’

Health-related food security cover! | आरोग्याशी निगडित खाद्यान्न सुरक्षा चव्हाट्यावर!

आरोग्याशी निगडित खाद्यान्न सुरक्षा चव्हाट्यावर!

Next

वाशिम, दि. १९- नागरिकांच्या आरोग्याशी निगडित खाद्यान्न सुरक्षेचा मुद्दा जिल्ह्यात सध्या ऐरणीवर असताना प्रशासकीय पातळीवरून यासंबंधी कुठलीच जनजागृती होताना दिसत नाही. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठकदेखील दरमहा होत नसल्याने खाद्यान्न सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर रूप धारण करीत असल्याचे दिसून येत आहे.
ग्राहक संरक्षण व संवर्धन करण्यासाठी केंद्रशासनाने १९८६ मध्ये ह्यग्राहक संरक्षण कायदाह्ण अमलात आणला. या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा स्तरावरील ग्राहक तक्रार निवारण मंचच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासोबतच विविध वस्तू तथा अधिकचा नफा मिळविण्याच्या हव्यासापायी अन्नभेसळ करणार्‍या खाद्यपदार्थ विकेत्यांवर वचक निर्माण होणे क्रमप्राप्त आहे; मात्र वाशिम जिल्ह्यात किमान सध्यातरी यासंबंधी कुठल्याही ठोस उपाययोजना अमलात आलेल्या नाहीत.

Web Title: Health-related food security cover!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.