साथीचे आजार; जवळा येथे आरोग्य पथकाची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 01:55 PM2019-06-25T13:55:19+5:302019-06-25T13:55:26+5:30
लोकमतने २४ जुनच्या अंकात वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर आरोग्य पथकाने येथे सोमवारी भेट देऊन १९२ घरांची व जलस्त्रोतांची पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड (वाशिम): तालुक्यातील जवळा येथे साथीचे आजार बळावण्यास सुरुवात झाली होती. येथील सुनिता चव्हाण या महिलेस त्यामुळेच ग्रामीण रुग्णालयात दाखल करावे लागले होते. या संदर्भात लोकमतने २४ जुनच्या अंकात वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर आरोग्य पथकाने येथे सोमवारी भेट देऊन १९२ घरांची व जलस्त्रोतांची पाहणी केली. गावात ठिकठिकाणी सांडपाण्याचे गटार साचल्याचे आरोग्य विभागाला दिसले. या संदर्भात ग्रामपंचायतला साफसफाई करण्याच्या व जलस्त्रोतांचे शुद्धीकरण करण्याच्या सुचनाही आरोग्य अधिकाऱ्यांनी केल्या. दरम्यान, २५ जुन रोजीही मोप प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष सिंग यांनीही गावाला भेट देऊन पाहणी केली.
रिसोड तालुक्यातील जवळा येथे गेल्या आठवड्यात अतिसारासह इतर साथीचे आजार बळावण्यास सुरुवात झाली होती. काही ग्रामस्थांना हगवण आणि उलट्यांचा त्रासही सुरू झाला होता. याच आजाराची लागण झालेल्या सुनिता संजय चव्हाण या महिलेस उपचारासाठी रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात सहा दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. पावसाळ्याच्या दिवसांत आजार बळावत असल्याने ग्रामस्थांत भितीचे वातावरणही निर्माण झाले होते. लोकमतने या संदर्भात ह्यजवळा येथे साथीचे आजारह्ण वृत्त प्रकाशित करून आरोग्य विभागाचे लक्ष वेधले. त्याची दखल घेऊन आरोग्य अधिकाऱ्यांनी जवळा येथे २४ जुन रोजीच पथकासह भेट देऊन १९२ घरांसह जलस्त्रोतांची तपासणी केली. यावेळी गावातील पाणी पुरवठ्याचे नळ, तसेच विहिरींसह ठिकठिकाणी सांडपाण्याचे गटार साचल्याचे, तसेच घाणकचºयाचे ढिग पसल्याचे आरोग्य विभागाला दिसून आले. त्यामुळे गावात स्वच्छता अभियान राबविण्यासह जलस्त्रोतांचे शुद्धीकरण करण्याच्या सुचना आरोग्य अधिकाºयांनी दिल्या. यावेळी डॉ. नागरे यांच्यासह आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका आणि आशासेविकांची उपस्थिती होती. त्यानंतर २५ जुन रोजी मोप प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष सिंग यांनी जवळा येथे भेट दिली.
जवळा येथे २४ आणि २५ जुन रोजी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जलस्त्रोतांतील पाणी दुषित असल्याचे आणि पाणी पुरवठ्याच्या नळशेजारी, तसेच गावात गटारे साचल्याचे दिसले. त्यामुळे सरपंचांना गावात साफसफाई करून जलस्त्रोतांचे शुद्धीकरण करण्याच्या सुचना दिल्या. पावसाळ्यात सुरुवातीचे पाणी दुषित राहणार असल्याने पिण्यासाठी शुद्ध पाणी वापरण्याच्या सुचनाही केल्या. दरम्यान, गावात अतिसाराची लागण झालेला केवळ एकच रग्ण आढळून आला.
-डॉ. आशिष सिंग
वैद्यकीय अधिकारी
प्राथमिक आरोग्य केंद्र मोप.