आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दैनावस्था!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 05:19 PM2018-06-30T17:19:10+5:302018-06-30T17:20:39+5:30
आसेगाव (वाशिम) : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी असलेल्या येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची मात्र पुरती दैनावस्था झाली असून घरांसभोवताल घाण पसरत असल्याने त्यांचेच आरोग्य धोक्यात सापडले आहे.

येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत परिसरातील २१ पेक्षा अधिक गावे जोडलेली असून २८ हजारांपेक्षा अधिक लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी उपकेंद्राला पेलावी लागते. कोणत्या वेळी कोणत्या आजारातील रुग्ण दवाखान्यात दाखल होईल, हे सांगता येत नसल्याने आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी थांबणे आवश्यक आहे. त्यासाठी मात्र सुसज्ज निवासस्थान असायला हवे; परंतु गेल्या अनेक वर्षांपासून निवासस्थानांची कुठलीच डागडूजी झालेली नाही. पावसाळ्यात तर अनेक घरांचे छत गळतात. यासंदर्भात वरिष्ठांकडे पत्रव्यवहार देखील करण्यात आला. मात्र, त्याचा अद्याप कुठलाच विशेष फायदा झाला नाही. त्यामुळे निवासस्थानांमध्ये वास्तव्य करणाऱ्यां कर्मचाऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.