लोकशाही दिनातील प्रकरणांची होणार सुनावणी !
By admin | Published: May 31, 2017 02:07 PM2017-05-31T14:07:29+5:302017-05-31T14:07:29+5:30
जिल्हास्तरीय लोकशाही दिन ५ जून २०१७ दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित केला आहे.
वाशिम : जून महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन ५ जून २०१७ दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित केला आहे. यावेळी मे महिन्यातील लोकशाही दिनात ठेवलेल्या तक्रारींची सुनावणी होणार आहे.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली व महिन्याच्या प्रत्येक तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरावर तहसीलदार यांचे अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. ज्या नागरिकांनी मे महिन्यात झालेल्या लोकशाही दिनामध्ये विहित नमुन्यातील अर्जामध्ये तक्रारी दाखल केल्या होत्या, त्याच तक्रारींवर ५ जून रोजीच्या लोकशाही दिनात सुनावणी ठेवण्यात आलेल्या आहेत. या सुनावणीतून तक्रारींचा निपटारा केला जाणार आहे.
तसेच ५ जून रोजी होणाऱ्या लोकशाही दिनात ज्या तक्रारी प्राप्त होतील, त्या ताक्ररींवरील कार्यवाही जुलै महिन्यातील लोकशाही दिनामध्ये करण्यात येईल. न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व प्रकरणे, अपील, सेवाविषयक, आस्थापनाविषयक तक्रार लोकशाही दिनात स्वीकारली जाणार नाही, असे महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले.