उष्माघात कक्ष केवळ दिखाव्यापुरतेच!
By Admin | Published: April 26, 2017 01:26 AM2017-04-26T01:26:03+5:302017-04-26T01:26:03+5:30
जिल्ह्यातील वास्तव: आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव
स्टिंग आॅपरेशन
वाशिम : उन्हाचा पारा गेल्या आठवड्यापासून चढलेला आहे. जिल्ह्याचा समावेश झाला आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये सर्व सोयी-सुविधायुक्त उष्माघात कक्ष निर्माण करणे अपेक्षित आहे. मात्र, जिल्ह्यातील विविध ग्रामीण रुग्णालयात उष्माघात नावालाच स्थापन करण्यात आले असून, या कक्षात सोयी-सुविधांची वानवा असल्याचे चित्र ‘लोकमत’ने २५ एप्रिल रोजी केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये समोर आले आहे.
जिल्ह्यातील विविध ग्रामीण रुग्णालयांत २५ एप्रिल रोजी ‘लोकमत’च्या चमूने ‘स्टिंग आॅपरेशन’ केले. यावेळी तीन रुग्णालयात उष्माघात झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी केवळ दिखावा म्हणून उष्माघात कक्ष स्थापन केला. यातील रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयांत ठेवलेला कूलर पाण्याविनाच चालविला जात असल्याचे दिसले, तर खिडक्यांना उन्हास प्रतिरोध करणाऱ्या पडदेही लावले नसल्याचे दिसून आले. कारंजा येथे स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याऐवजी उपलब्ध वार्डातच दोन कूलर ठेवून तकलादू सुविधा करण्याचा केविलवाना प्र्रयत्न करण्याता. मानोरा येथे एका वार्डात उष्माघात कक्ष म्हणून फलक लावला; परंतु आतमध्ये खाटांवर केवळ पांढऱ्या चादरी टाकून ठेवण्यापलिकडे कुठलीही आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याचे आणि त्या ठिकाणचा कूलर पाण्याविनाच असल्याचे दिसले. विशेष म्हणजे हा कक्ष दुपारच्या सुमारास कूलुप बंद असल्याचे आणि रुग्ण इतरच वार्डात ठेवल्याचेही दिसले. सध्या जिल्ह्यातील तापमान उच्चांक गाठत आहे. अशा तापमानामुळे उष्माघात होण्याची दाट शक्यता असते.
अशा स्थितीत सामान्यत: सरकारी रुग्णालयात स्वतंत्र उष्माघात कक्ष निर्माण केले जातात; परंतु जिल्ह्यातील बहुतेक ग्रामीण रुग्णालयात अद्याप उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्षच निर्माण करण्यात आलेला नाही. तर ज्या ठिकाणी उष्माघात कक्ष आहेत. त्या ठिकाणी रुग्णांना कुठल्याही मूलभूत सुविधा नसल्याचे चित्र होते.
रुग्णालयात स्वतंत्र कक्ष नसला तरी, उपलब्ध असलेल्या कक्षात उष्माघाताच्या रुग्णांसाठी सुविधांची पूर्तता करून ते सज्ज करण्यात आले आहेत. या वार्डमध्ये प्रत्येकी एक कुलर ठेवण्यात आला असून, त्यामध्ये नियमित पाणी टाकले जाते.
- एन. आर. साळुंके, प्रभारी वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय कारंजा लाड