वाशिम जिल्ह्यात दमदार पाऊस; वीज पडून दोन गुरे ठार

By सुनील काकडे | Published: September 21, 2023 06:08 PM2023-09-21T18:08:29+5:302023-09-21T18:09:28+5:30

वाशिम जिल्ह्यात २१ सप्टेंबर रोजी सर्वदूर दमदार पाऊस झाला. यादरम्यान रिसोड तालुक्यातील नेतन्सा या गावात अंगावर वीज पडून दोन गुरे ठार झाल्याची घटना घडली.

Heavy rain in Washim district Two cattle were killed by lightning | वाशिम जिल्ह्यात दमदार पाऊस; वीज पडून दोन गुरे ठार

वाशिम जिल्ह्यात दमदार पाऊस; वीज पडून दोन गुरे ठार

googlenewsNext

वाशिम : जिल्ह्यात २१ सप्टेंबर रोजी सर्वदूर दमदार पाऊस झाला. यादरम्यान रिसोड तालुक्यातील नेतन्सा या गावात अंगावर वीज पडून दोन गुरे ठार झाल्याची घटना २.३० वाजेच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, रिसोड तालुक्यातील नेतन्सा येथील शेतकरी तुकाराम विठोबा बाजड यांच्या शेतात झाडाखाली गुरूवारी एक गाय आणि म्हैस बांधून ठेवली होती. 

अशात दुपारी २.३० वाजताच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली काहीच क्षणात आकाशातून सळसळत आलेली वीज गाय आणि म्हशीवर कोसळली. त्यात दोन्ही गुरे जागीच ठार झाली. संबंधित शेतकऱ्याचे यामुळे एक लाखांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Heavy rain in Washim district Two cattle were killed by lightning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम