मालेगावात जोरदार अवकाळी पाऊस : कपाशी, तुरीच्या पिकाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 04:02 PM2017-11-22T16:02:08+5:302017-11-22T16:03:53+5:30

वाशिम: गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात ढगाळी वातावरणामुळे कपाशी आणि तुरीचे पीक संकटात सापडले असतानाच बुधवारी दुपारच्या सुमारास मालेगाव तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस कोसळला.

Heavy rain in Malegaon: Cotton, turmeric crop hit | मालेगावात जोरदार अवकाळी पाऊस : कपाशी, तुरीच्या पिकाला फटका

मालेगावात जोरदार अवकाळी पाऊस : कपाशी, तुरीच्या पिकाला फटका

Next
ठळक मुद्देउत्पादनात घट येण्याची भिती शेतकºयांच्या संकटात अधिकच भर पडली आहे.

वाशिम: गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात ढगाळी वातावरणामुळे कपाशी आणि तुरीचे पीक संकटात सापडले असतानाच बुधवारी दुपारच्या सुमारास मालेगाव तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस कोसळला. अर्धा तास कोसळलेल्या या पावसामुळे कपाशी आणि तुरीच्या पिकाला मोठा फटका बसला असून, शेतकºयांच्या संकटात अधिकच भर पडली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मालेगावसह जिल्हाभरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यातच हवामान खात्यानेही विदर्भात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती. ती शक्यता खरी ठरली आणि बुधवारी मालेगाव तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे खरीपातील दीर्घकालीन पीक असलेल्या तुरीला मोठा फटका बसला असून, पावसामुळे फुलोरा गळून पडल्याने या पिकाच्या उत्पादनात घट येणार आहे. पूर्वी ढगाळ वातावरणामुळे या पिकाचा फुलोरा गळण्यास सुरुवात झाली होती. आता अवकाळी पावसाने त्यात अधिकच भर पडली आहे. दरम्यान, कपाशीच्या पिकालाही या पावसाचा फटका बसला असून, वेचणीवर आलेली बोंडे पावसात भिजल्याने शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आधीच विविध अस्मानी, सुल्तानी संकटात सापडलेल्या शेतकºयाला आता अवकाळी पावसानेही फटका दिला आहे. 

Web Title: Heavy rain in Malegaon: Cotton, turmeric crop hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस