वाशिममधील सुरकंडी लघूप्रकल्प पावसामुळे तुडूंब भरला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 03:54 PM2018-07-19T15:54:31+5:302018-07-19T15:55:44+5:30

वाढत्या जलसाठयामूळे पुलावर आले पाणी

heavy rain in vashim | वाशिममधील सुरकंडी लघूप्रकल्प पावसामुळे तुडूंब भरला

वाशिममधील सुरकंडी लघूप्रकल्प पावसामुळे तुडूंब भरला

Next

वाशिम - वाशिम तालुक्यातील सुरकंडी येथील लघू प्रकल्प पावसाच्या पाण्यामूळे तुडुंब भरला आहे. प्रकल्पातील वाढत्या जलसाठयामूळे धरणाच्या बुडीत क्षेत्रातून गेलेल्या रस्त्यावरील पुलावर गुरुवारी पाणी आले.

वाशिम तालुक्यातील सुरकंडी येथील लांडकदरा शेतशिवारात सन २००७-२००८ मध्ये लघू प्रकल्पाचे काम सुरु झाले होते. तब्बल दहा वर्षांनंतरही धरणाचे काम पूर्ण झालेले नाही. चारशे हेक्टरच्या आसपास शेती सिंचनाखाली येणार असलेला हा प्रकल्प सध्या पाण्याने तुडूंब भरला आहे. या धरणाच्या बुडीत क्षेत्रातील शेतशिवारातून मागील बाजूने वाशिमकडून येणारा जि. प. च्या अंतर्गत असलेला सुरकंडी खु., सुरकंडी बु, फाळेगाव थेट, शिरपूटी, कृष्णा, वारला, अनसिंग हा रस्ता जातो. या रस्त्यावर सुरकंडी गावालगत असलेल्या कमी उंचीच्या पुलाच्या समपातळीत बुधवारपर्यंत जलसाठा होता. जलसाठयात वाढ झाल्याने गुरुवारी पुलावर पाणी आले. प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली तर लवकरच हा पूल पाण्याखाली जाणार यात शंका नाही.


 

Web Title: heavy rain in vashim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस