वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 01:18 PM2020-06-16T13:18:01+5:302020-06-16T13:18:10+5:30

गत २४ तासांत जिल्ह्यात ११.९६ मीमीच्या सरासरीने एकूण ७१.७६ मीमी पाऊस झाल्याची नोंद आहे.

Heavy rains for second day in a row in Washim district! | वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊस !

वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊस !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सलग दुसºया दिवशीही १५ जून रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला. गत २४ तासांत जिल्ह्यात ११.९६ मीमीच्या सरासरीने एकूण ७१.७६ मीमी पाऊस झाल्याची नोंद आहे.
जिल्ह्यात १०, ११ व १२ जूनला कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला होता. १३ जून रोजी विश्रांती घेतलेल्या पावसाने १४ जुनला पुन्हा दमदार हजेरी लावून शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला. १५ जून रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास वाशिम शहरासह जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झाला. या पावसामुळे पेरणीच्या कामांना गती देणार असून, पाऊस ओसरल्यानंतर दुपारी ३ ते ५ या वेळेत खते, बियाणे खरेदीसाठी शेतकºयांनी वाशिम येथील कृषी सेवा केंद्रांमध्ये गर्दी केल्याचे दिसून आले. दरम्यान, १४ जून सायंकाळी ६ ते १५ जून सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ११.९६ मीमीच्या सरासरीने एकूण ७१.७६ मीमी पाऊस झाल्याची नोंद आहे. यामध्ये वाशिम तालुक्यात १७.५६ मीमी, रिसोड तालुक्यात ४.३८ मीमी, मालेगाव तालुक्यात १८.२८ मीमी, मंगरूळपीर तालुक्यात १८.२९ मीमी, मानोरा तालुक्यात ११.५० मीमी, कारंजा तालुक्यात १.७५ मीमी पाऊस झाला. १ ते १५ जून या दरम्यान जिल्ह्यात ९५.५२ मीमीच्या सरासरीने एकूण ५७३.०९ मीमी पाऊस झाला. १ ते १५ जून या कालावधीत सर्वाधिक पाऊस मालेगाव तालुक्यात १३०.०२ मीमी तर सर्वात कमी पाऊस मानोरा तालुक्यात ४७.६१ मीमी झाला. दमदार पाऊस झाल्याने मालेगाव, वाशिम, कारंजा व मंगरूळपीर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पेरणीला सुरूवात झाल्याचे दिसून येते.

Web Title: Heavy rains for second day in a row in Washim district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.