मंगरुळपीर शहरासह तालुक्यात दमदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 11:19 AM2020-07-17T11:19:12+5:302020-07-17T11:19:25+5:30
तालुक्यासह शहरात १६ जुलै रोजी सकाळाच्या दरम्यान दमदार पाऊस झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर : तालुक्यासह शहरात १६ जुलै रोजी सकाळाच्या दरम्यान दमदार पाऊस झाला. यावर्षीचा हा सर्वात जास्त पाऊस असून शेलुबाजार येथे अनेक दुकानात व घरात पाणी शिरले.
जून महिन्यात पाहिजे तसा पाऊस तालुक्यात झाला नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले होते. परंतु जुलै महिन्यात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली. तर १६ जुलै रोजी तालुका व शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली.यामुळे तालुक्यातील शेलुबाजार पोलीस चौकीसह येथील अनेक घरात व दुकानात पाणी शिरले औरंगाबाद - नागपूर महामार्गावर पावसाने अनेक वाहने उभी होती. गतवर्षी तालुक्यात ७८६.१३ मि मि एवढी पावसाची नोंद झाली होती. या यावर्षी १५ जुलैपर्यंत ३९५.१० एवढी नोंद असून आजच्या पावसामुळे यात वाढ होणार आहे. गुरुवारी झालेल्या पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून गतवर्षी जाणवणारी पाणी टंचाई दूर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसामुळे शेतकरी आनंदित दिसून येत आहे.