वाशिम जिल्ह्यात दमदार पाऊस; पिकांना संजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 05:35 PM2020-06-28T17:35:00+5:302020-06-28T17:35:36+5:30
गत २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २२.९७ मिमी पाऊस झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: २७ जून रोजी रात्रीच्या सुमारास कारंजा तालुक्याचा अपवाद वगळता जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने पिकांना संजिवणी मिळाली. गत २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २२.९७ मिमी पाऊस झाला. दरम्यान रिसोड तालुक्यातील मोप, वाकद, बाळखेड येथे शेतात पाणी साचल्याने शेतकºयांचे नुकसानही झाले.
गतवर्षी पावसात सातत्य नसल्याने खरीप हंगामात शेतकºयांना समाधानकारक उत्पन्न घेता आले नाही. गतवर्षीची कसर भरून काढण्यासाठी यावर्षी शेतकरी मे महिन्यापासूनच शेती मशागतीच्या कामाला लागले होते. यावर्षीही मान्सूनचे उशिराने आगमन होईल, असा अंदाज हवामान खात्याने सुरूवातीला वर्तविला होता. जिल्ह्यात १० ते १४ जून या दरम्यान दमदार पाऊस झाल्याने जवळपास ९० टक्क्यापेक्षा अधिक शेतकºयांनी पेरण्या उरकल्या. यावर्षी ४ लाख ६ हजार २३४ हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला. २६ जूनपर्यंत जवळपास ९० टक्के पेरण्या झाल्या. १६ जूनपासून पावसाने दडी मारल्याने हलक्या जमिनीतील बियाणे उगवले नाही तसेच काही निकृष्ट दर्जाचे बियाणेदेखील उगवले नसल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत. त्या अनुषंगाने कृषी विभाग व महाबिजच्यावतीने नुकसानग्रस्त भागात पंचनामे सुरू आहेत.
दरम्यान, २५ जून रोजीच्या रात्री जिल्ह्यात बºयापैकी पाऊस झाला. विशेषत: रिसोड तालुक्यातील वाकद, मोप, बोरखेडी, बाळखेड या परिसरात दमदार पाऊस झाल्याने शेतात पाणी साचले. काही शेती खरडूनही गेली. त्यामुळे शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले. कृषी व महसूल विभागाने पाहणी करून नुकसानभरपाई देण्याची मागणीही शेतकºयांनी केली. त्यानंतर २७ जून रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारासही जिल्ह्यात पाऊस झाला. २७ जूनच्या रात्रीदरम्यान कारंजा तालुक्याचा अपवाद वगळता उर्वरीत ठिकाणी दमदार पाऊस झाल्याने पिकांना संजिवणी तर शेतकºयांनाही दिलासा मिळाला.