छोट्या मालवाहू वाहनांतून जड वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 05:02 AM2021-02-23T05:02:22+5:302021-02-23T05:02:22+5:30
.............. शाळा बंद झाल्याने ऑटोचालक हवालदिल मेडशी : लॉकडाऊनमधून शिथिलता मिळाल्यानंतर पाचवीपासून बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या होत्या; मात्र कोरोनाच्या ...
..............
शाळा बंद झाल्याने ऑटोचालक हवालदिल
मेडशी : लॉकडाऊनमधून शिथिलता मिळाल्यानंतर पाचवीपासून बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या होत्या; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने शाळा बंद केल्याने विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे ऑटोचालक हवालदिल झाले आहेत.
.............
मजूर परतताहेत पुन्हा घराकडे
किन्हीराजा : मध्यंतरी कोरोनातून दिलासा मिळाल्याने अनेक मजूर आपापल्या कामावर रुजू झाले होते; मात्र संकट वाढण्याचे संकेत असल्याने हे मजूर आता पुन्हा घराकडे परतत असल्याचे दिसत आहे.
..............
सहा मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
वाशिम : कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी जिल्ह्यात ६ मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश यांनी लागू करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी निर्गमित केले आहेत.
................
बैलांच्या गोठ्याला आग; दोन बैलांचा मृत्यू
बोराळा : येथून जवळच असलेल्या खंडाळा शिंदे येथील शेतकरी परसराम नामदेव शिंदे यांच्या सोयाबीन कुटार ठेवून असलेल्या बैलांच्या गोठ्याला २१ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास आग लागली. या घटनेत दोन बैलांचा होरपळून मृत्यू झाला. यामुळे शिंदे यांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.