गरोदर मातांना मिळणारी मदत तात्काळ देण्यात यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:29 AM2021-05-28T04:29:51+5:302021-05-28T04:29:51+5:30

.बाळंतपण काळात शासनाच्यावतीने मातांना आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे. या अनुषंगाने रिठद केंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्व मातांना मदत तात्काळ ...

The help given to pregnant mothers should be given immediately | गरोदर मातांना मिळणारी मदत तात्काळ देण्यात यावी

गरोदर मातांना मिळणारी मदत तात्काळ देण्यात यावी

Next

.बाळंतपण काळात शासनाच्यावतीने मातांना आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे. या अनुषंगाने रिठद केंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्व मातांना मदत तात्काळ वितरित करावी, असे निवेदनात नमूद केले आहे. याबाबत आरोग्य अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता, हा निधी केंद्रांतर्गत दि अलाहाबाद बँकेमध्ये जमा करण्यात आल्याचे सांगण्यात आले; परंतु हा निधी अद्याप सदर मातेच्या खात्यामध्ये वळता करण्यात आला नाही. शासनाच्यावतीने निधी प्राप्त असतानाही बँकेमार्फत दिरंगाई होत आहे. याबाबत तपास करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. लाभार्थ्यांची यादी व चेक केंद्राला दिला आहे व सदर केंद्राने बँकेमध्ये जमा केला आहे. तरीही बराच कालावधी झाला, तरी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झाली नाही. ही रक्कम जमा करावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य तथा राष्ट्रवादी पदाधिकारी गजानन आरू यांनी जिल्हा आरोग्याधिकारी यांच्याकडे केली आहे.

Web Title: The help given to pregnant mothers should be given immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.