विजेच्या उच्च दाबाने उपकरणे जळाली

By admin | Published: June 12, 2014 10:54 PM2014-06-12T22:54:48+5:302014-06-12T23:08:26+5:30

शेलुबाजार येथे ११ च्या रात्री अचानक विजेचा दाब वाढल्याने अनेक ग्राहकांच्या घरातील विजेवर चालणारी हजारो रुपये किंमतीची उपकरणे निकामी झाली आहे

High pressure power burns equipment | विजेच्या उच्च दाबाने उपकरणे जळाली

विजेच्या उच्च दाबाने उपकरणे जळाली

Next

मंगरूळपीर: तालुक्यातील शेलुबाजार येथे ११ च्या रात्री अचानक विजेचा दाब वाढल्याने अनेक ग्राहकांच्या घरातील विजेवर चालणारी हजारो रुपये किंमतीची उपकरणे निकामी झाली आहे गेल्या पंधरा दिवसातील दुसरी घटना आहे.या घटनेबाबत येथील ग्राहक रमेश अपुर्वा यांनी १२ जून रोजी स्थानिक महावितरण कार्यालयात जाऊन तक्रार दिली आहे. शेलूबाजार येथे मंगरूळपीरनंतर सर्वात मोठी बाजारपेठ आहे.तसेच मोठा बैलबाजार व अन्य कार्यालये आहेत.येथील महावितरण कार्यालयाचा कारभार मुख्यालयी न राहणार्‍या कनिष्ठ अभियंतामुळे बिघडला आहे.मागील कित्येक दिवसांपासून सदर अभियंताच्या कामकाज पद्धतीबाबत अनेक प्रकारच्या तक्रारी झाल्या परंतु त्यांच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई झाली नाही . काही दिवसापुर्वी तेथील महावितरण कार्यालयाच्या भोंगळ कारभाराला कंटाळुन ग्राम पंचायत सदस्य प्रकाश अपुर्वा, पंचायत समिती सदस्य विलास लांभाडे यांनी कार्यालयाला ताला ठोकला होता त्यानंतर नविन लाईनमन देण्यात येईल असे लेखी आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र नविन लाईनमन कडे आधीच तर्‍हाळा,पुंजाजीनगर तपोवन ही गावे आहेत.त्या भागात जवळपास ३५ रोहीत्र आहेत त्या गावासह शेलूबाजारचा कारभार सुध्दा त्यांच्याकडेच देण्याचा घाट अभियंत्यांनी घातला शेलूबाजारात सुध्दा जवळपास ३0 रोहीत्रे आहेत. परंतु लाईनमनने ६५ रोहीत्राचा काम पाहण्यास नकार दिल्यामुळे अद्यापही शेलूबाजारला लाईनमन देण्याबाबत विचार करण्यात आला नाही.तेथे कार्यरत लाईनमन मुख्यालयी थांबत नसल्यामुळे ग्राहकांना प्रंचड त्रास सहन करावे लागत आहे वर्षभरात विविध भागात अनेकवेळा विजेचा दाब वाढल्यामुळे ग्राहकांना हजारोचा फटका सहन करावा लागला.कनिष्ठ अभियंता मुख्यालयी थांबुन कामे करून घेण्यास वेळ देत नसल्याने अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत आहे. दरम्यान, शेलूबाजार ग्रामपंचायतीने सदर अभियंत्याच्या कारभाराबाबत सर्वानुमते ठराव घेऊन वरिष्ठांकडे पाठविला.मात्र अद्यापही कुठलीच कारवाई झाली नसल्याचे दिसून येते.

Web Title: High pressure power burns equipment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.