रेडिरेकनरच्या जाहीर दरानंतर अकोला रस्त्यावरील जमिनीला सर्वाधिक भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 12:21 PM2020-10-03T12:21:35+5:302020-10-03T12:24:16+5:30

Property Rate in Washim अकोला मार्गावर जमिनीचा सर्वाधिक दर असल्याचे दिसून आले.

The highest price for land on Akola Road after Redreckner's rate | रेडिरेकनरच्या जाहीर दरानंतर अकोला रस्त्यावरील जमिनीला सर्वाधिक भाव

रेडिरेकनरच्या जाहीर दरानंतर अकोला रस्त्यावरील जमिनीला सर्वाधिक भाव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्य सरकारने रडीरेकनरचे (स्थावर व जंगम मालमत्ता खरेदीसाठी रेडी रेकनरच्या दराचा वापर केला जातो जमिनच्या व्यवहाराचे मूल्य दर तक्के म्हणजेच इंग्रजीत रेडी रेकनर संबोधले जाते.) दर जाहीर केल्यानंतर वाशिम शहरातील अकोला महामार्गावरील जमिनीला (अकृषक) सर्वाधिक भाव दिसून येत आहे.
गत महिन्यात राज्यभरात रेडीरेकनरच्या दरात सरासरी १.७४ टक्के अशी वाढ करण्यात आली आहे. यामध्ये वाशिमात १.९९ टक्कांची वाढ झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागात २.४० टक्के, प्रभाव क्षेत्रात १.८८ टक्के, नगरपालिका, नगर पंचायत क्षेत्रात १.७० टक्के वाढ वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार वाशिम शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील जमिनीच्या भावाचा आढावा घेतला असता रेडीरेकनरचे दर जाहीर झाल्यानंतर अकोला मार्गावर जमिनीचा सर्वाधिक दर असल्याचे दिसून आले.
वाशिम शहरातील अकोला रस्त्यावरील झाकलवाडी फाटयापर्यंत २ हजार रुपये स्क्वेअरमिटरचे दर आहेत. तर अकोला रस्त्यावरीलच झाकलवाडी फाटयाच्यापुढे जांभरुण परांडेपर्यंत १२१५ रुपये स्क्वेअर मिटरचे दर आहेत. तसेच हिंगोली रस्त्यावरील पंचाळा फाटापर्यंत १४३० रुपये स्क्वेअर मिटर तर त्यापुढील कंझरा ते राजगावपुढे १३४५ रुपये स्क्वेअर मिटरचे भाव आहेत. वाशिम शहरातील ईतर रस्त्यांवरील जमिनीचे दर मात्र १२१५ रुपये स्क्वेअर मिटर आहेत. यामध्ये पुसद रस्ता ते दगडउमरा गावापर्यंत, रिसोड रोड ते जांभरुण नावाजी गावापर्यंत भागाचा समावेश आहे. तसेच शहरातील रस्त्यावरील शेतीचे भाव २ हजार रुपये चौरस मिटर आहेत.


रेडिरेकनरचे दर जाहीर झाल्यानंतर शहरातील अकृषक जमिनीसाठी किंचित वाढ झाली आहे. हे दर भविष्यात कृषक जमिन अकृषक करणाऱ्यांसाठी आकारण्यात येतील.
- एस.पी. शेटे
सहाय्यक नोंदणी अधिकारी, वाशिम

Web Title: The highest price for land on Akola Road after Redreckner's rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.