महामार्ग पोलिसांची १,२५१ वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 03:09 PM2020-02-12T15:09:52+5:302020-02-12T15:10:24+5:30

त्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज असलेले इंटरसेप्टर वाहन महामार्ग पोलिस केंद्र, अमानीच्या ताफ्यात दाखल झाले आहे.

Highway police take action on 1251 vehicles | महामार्ग पोलिसांची १,२५१ वाहनांवर कारवाई

महामार्ग पोलिसांची १,२५१ वाहनांवर कारवाई

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर प्रभावीरित्या नियंत्रण मिळविता यावे, यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज असलेले इंटरसेप्टर वाहन महामार्ग पोलिस केंद्र, अमानीच्या ताफ्यात दाखल झाले आहे. त्याव्दारे महामार्ग पोलिसांनी गत काही दिवसांत वाहतूक नियम मोडणाºया १,२५१ वाहनांवर धडक कारवाई केली, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक नितीन दांदडे पाटील यांनी मंगळवार, ४ फेब्रूवारी रोजी दिली.
इंटरसेप्टर वाहनामध्ये अत्याधुनिक स्वरूपातील विविध उपकरणे देण्यात आली आहेत. त्यातील ‘लेझर स्पीड गन’ या उपकरणाव्दारे रस्त्यावरून धावणाºया वाहनांचा वेग संतुलित ठेवणे व भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करून चालान करता येणे सुलभ झाले आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन करणारे वाहन चालान केल्यानंतर संबंधित वाहनमालकाच्या मोबाईलवर परस्परच संदेश पाठविला जातो. तसेच विनाहेल्मेट दुचाकी वाहन चालविणारे चालक व सीट बेल्ट न लावणाºया चालकांवरही कारवाई करणे सोपे झाले आहे.
चारचाकी वाहनांच्या काचांवर लावलेली ब्लॅक फिल्म ही नियमानुसार योग्य आहे किंवा अयोग्य, हे तपासण्यासाठी टीआयएनटी टेस्ट उपलब्ध असून या मीटरद्वारे ब्लॅक फिल्म तपासणी केली जात आहे. ब्लॅक फिल्म ही सदोष असल्याचे उपकरणाद्वारे आढळून आल्यास मोटार वाहन कायद्यानुसार चालानद्वारे दंड आकारणी केली जात आहे.
दरम्यान, महामार्ग पोलिसांनी इंटरसेप्टर वाहनातील उपकरणाच्या सहाय्याने गत काही दिवसांमध्ये नांदेड ते अकोला आणि नागपूर ते औरंगाबाद या महामार्गांवर वेगमर्यादा ओलांडणाºया ९७७ वाहनधारकांकडून ९ लाख ७७ हजार, ब्लॅक फिल्म सदोष असलेल्या ५८ वाहनधारकांकडून ११ हजार ६००, विना हेल्मेट वाहन चालविणाºया २१५ वाहनधारकांकडून १ लाख ७ हजार ५०० अशा एकूण १२५१ वाहनधारकांकडून १० लाख ९६ हजारांचा दंड वसूल केला, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक नितीन दांदडे यांनी दिली.

इंटरसेप्टर वाहनांमध्ये अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध असून त्याव्दारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनधारकांविरूद्ध कारवाई करणे सोपे झाले आहे. वाहनचालकांनीही मोटार वाहन कायद्याचे पालन करून पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे. ११ फेब्रूवारीला वाशिम शहरातील पुसद नाका येथे नागरिकांना इंटरसेप्टर वाहनासंबंधी माहिती देण्यात आली.
- नितीन दांदडे पाटील
पोलिस उपनिरीक्षक
महामार्ग पोलिस केंद्र, अमानी

Web Title: Highway police take action on 1251 vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.