महामार्गाच्या कामामुळे नागरिकांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 12:55 PM2019-12-28T12:55:57+5:302019-12-28T12:56:16+5:30

सर्व नियमाची तंतोतंत पालन व्हायला अपेक्षित होते परंतु कंत्राटदार एजन्सी हेतुपुरस्सर याकडे दुर्लक्ष करीत असताना दिसत आहे.

Highway work becom dangers for citizens | महामार्गाच्या कामामुळे नागरिकांचा जीव धोक्यात

महामार्गाच्या कामामुळे नागरिकांचा जीव धोक्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर :शहरातून जाणाº्या दोन महामार्गाचे काम सुरु आहे. कामे करणाऱ्या दोन्ही स्वतंत्र कंत्राटदार एजन्सीने सर्व नियम धाब्यावर बसवून शहरातील रहदारीचे तीन तेरा वाजवले आहे. तसेच शहरातून जड वाहनांची सतत येºजा असल्याने, अपघातात वाढ होऊन प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे. हे रस्ते बांधकाम नागरिकांच्या विशेषत: विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले आहे.
महान-आर्णी व अमरावती-वाशिम असे दोन महामार्ग शहरातून जातात. या दोन्ही रस्त्यांचे बांधकाम सध्या सुरू आहे. या महामार्गाच्या बांधकामामध्ये अवजड वाहनाचा उपयोग केल्या जात असल्याने पंचशील नगर ते शिंदे कॉलनी, बालदेव ते नदीपर्यंत या अवजड वाहनांची सतत ये-जा असते. या अवजड वाहनाचे चालक रहदारीचे सर्व नियम धाब्यावर बसवून भरधाव वेगाने ही वाहने चालवताना आढळत आहे. सर्वाधिक विद्यार्थी असलेली माध्यमिक व उच्च माध्यमिक जिल्हा परिषद हायस्कूल, सिद्धार्थ विद्यालय मंगरूळपीर अकोला मार्गावर शहरात आहे. भरधाव वेगाने चालणाºया अवजड वाहनाने विद्यार्थी व महिलांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. सर्वत्र गिट्टी दगड पडलेले असल्याने वाहनाच्या भरधाव वेगामुळे हे गिट्टी दगड उडून नागरिकांना लागून जखमी होण्याच्या अनेक घटना दररोज घडत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या महामागार्चे बांधकाम होत असताना त्यातील सर्व नियमाची तंतोतंत पालन व्हायला अपेक्षित होते परंतु कंत्राटदार एजन्सी हेतुपुरस्सर याकडे दुर्लक्ष करीत असताना दिसत आहे.
वातावरणात धूळ उडू नये म्हणून खोदकामावर सतत पाणी शिंपडत राहणे हा त्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. कंत्राटदार एजन्सी नियमाचे पालन करीत नसल्याने शहरातील प्रदूषणात वाढ होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. शासन व प्रशासन व्यवस्था यावर काहीही उपाययोजना करीत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष खदखदत आहे.
 

शहर वाहतूक पोलीसाची आवश्यकता !
शिवाजी चौक व डॉ. आंबेडकर चौकामध्ये प्रचंड प्रमाणात रहदारी निर्माण झाल्याने छोट्या अपघातात वाढ झालेली आहे. म्हणून पोलिस विभागाने दोन्ही चौकामध्ये स्वतंत्र चार ट्राफिक हवालदारांना सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत तैनात करण्याची मागणी नागरीकातून होत आहे.

Web Title: Highway work becom dangers for citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.