महामार्गाच्या कामातून होणार ४९ तलावांचे खोलीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:21 AM2021-02-28T05:21:53+5:302021-02-28T05:21:53+5:30

आमदार अमित झनक यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत वाशिम जिल्ह्यातील पाणी समस्येबाबत ...

Highway work will deepen 49 lakes | महामार्गाच्या कामातून होणार ४९ तलावांचे खोलीकरण

महामार्गाच्या कामातून होणार ४९ तलावांचे खोलीकरण

googlenewsNext

आमदार अमित झनक यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत वाशिम जिल्ह्यातील पाणी समस्येबाबत त्यांना माहिती दिली. यात प्रामुख्याने मालेगाव-रिसोड मतदारसंघातील पाणी समस्येवर त्यांनी चर्चा केली. त्याची दखल घेत नितीन गडकरी यांनी या संदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जलसंधारणावर कार्य करणाऱ्या चमूमधील बाळासाहेब ठेंगे, विजय पाटील आणि सचिन कुळकर्णी यांना दिल्या. त्यावरून या चमूने रिसोड-मालेगाव मतदारसंघातील पाणी समस्येचा अभ्यास करून महामार्गाच्या कामाची जलसंधारणाशी सांगड घालण्याबाबत सर्वंकष अहवाल सादर केला. हा अहवाल आमदार अमित झनक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केल्यानंतर यावर प्रत्यक्ष बैठकीचे आयोजन करून चर्चा करण्यात आली. यात वाशिम जिल्ह्यातील ४९ तलावांतील गाळ व मुरूम काढून त्याचा अकोला-नांदेड महामार्गासह समृद्धी महामार्गासाठी वापर करण्याचे निश्चित करण्यात आले.

----

पहिल्या टप्प्यात १२ तलावांची कामे

महामार्गाच्या कामातील गौणखनिजांची पूर्तता करण्यासाठी पहिल्या टप्प्यात १२ तलावांचे खोलीकरण करण्यात येणार आहे. त्यात सायखेडा, सावरगाव, अमानी, पांगरी नवघरे, झोडगा खु., खडकी, चिवरा आदी गावांतील तलावांचा समावेश आहे.

---

४० गावांतील १.६० लाख लोकांना फायदा

महामार्गाच्या कामातून केल्या जाणाऱ्या ४९ तलावांच्या खोलीकरणामुळे मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण होऊन त्याचा ४० गावांतील १ लाख नागरिकांना फायदा होणार आहे. प्रामुख्याने यात मालेगाव तालुक्यातील गावांचा समावेश आहे.

-------

७२२४ टीसीएम जलसाठा निर्मिती

महामार्गाच्या कामासाठी होणाऱ्या जिल्ह्यातील ४९ तलावांच्या खोलीकरणातून तब्बल ७,२२४ टीसीएम अतिरिक्त जलसाठा तयार होणार असल्याने संबंधित भागांतील पाणी समस्येवर प्रभावी नियंत्रण मिळणार आहे.

----------

२,३०८.......... हेक्टर शेतीत सिंचन

जिल्ह्यातील ४९ तलावांच्या खोलीकरणातून संबंधित भागांतील केवळ पाणीसमस्येवर नियंत्रण मिळणार आहेच, शिवाय २,४०८.............. हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे.

------------

११ योजनांचे बळकटीकरण नि:शुल्क

जिल्ह्यात खोलीकरण केल्या जाणाऱ्या ४९ तलावांच्या माध्यमातून शासनाच्या कोट्यवधींच्या निधीची बतच होणार असून, या कामामुळे ११ पाणी पुरवठा योजनांंचे बळकटीकरण अगदी नि:शुल्क होणार आहे.

Web Title: Highway work will deepen 49 lakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.