रिठद येथील बालकाचा ‘स्वाइन फ्लू’ने मृत्यू
By admin | Published: May 18, 2017 01:38 AM2017-05-18T01:38:05+5:302017-05-18T01:38:05+5:30
वाशिम : ‘स्वाइन फ्लू’च्या आजाराने जिल्ह्यातील रिठद (ता. रिसोड) येथील १२ वर्षीय बालकाचा अकोल्यातील एका खासगी इस्पितळात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ‘स्वाइन फ्लू’च्या आजाराने जिल्ह्यातील रिठद (ता. रिसोड) येथील १२ वर्षीय बालकाचा अकोल्यातील एका खासगी इस्पितळात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली.
‘स्वाइन फ्लू’ हा श्वसन यंत्रणेशी संबंधित आजार आहे. वराहांमध्ये आढळणाऱ्या या विषाणूंचा हवेच्या माध्यमातून प्रसार होतो. एकापासून दुसऱ्याला या आजाराची लागण होते. सामान्यत: २४ अंश सेल्सियसपेक्षा अधिक तापमानात या आजाराचा विषाणू तग धरत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे; परंतु जिल्ह्यातील तापमान ४२ अंशांच्या घरात असतानाही ‘स्वाइन फ्लू’चे रुग्ण आढळत आहेत. रिठद येथील १२ वर्षीय बालकास ‘स्वाइन फ्लू’सदृश आजाराची लक्षणे आढळून आल्यानंतर अकोल्यातील एका मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. येथे त्याला स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच मंगळवारी त्याचा मृत्यू झाला.