हिंदू, बौद्ध, मुस्लीम बांधवांचा मेडशीत रंगला परिचय मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:45 AM2021-08-24T04:45:57+5:302021-08-24T04:45:57+5:30
मेडशी येथे हिंदू, मुस्लीम, बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात असून गुण्यागोविंदाने नांदत आहे. राष्ट्रीय एकात्मता जोपासणारे गाव म्हणून मेडशीची पूर्वीपासूनच ...
मेडशी येथे हिंदू, मुस्लीम, बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात असून गुण्यागोविंदाने नांदत आहे. राष्ट्रीय एकात्मता जोपासणारे गाव म्हणून मेडशीची पूर्वीपासूनच ओळख आहे. ग्रामस्थ एकमेकांच्या धार्मिक उत्सवात सहभागी होऊन सण साजरे करतात. दरम्यान, नवीन पिढीत सलोखा कायम रहावा, यासाठी मुस्लीम युवकांनी पुढाकार घेत मोमीनपुरा मस्जिदमध्ये हिंदू, मुस्लीम आणि बौद्ध बांधवांसाठी मस्जिद परिचय मेळाव्याचे आयोजन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शेख जमिरभाई होते. प्रमुख पाहुणे म्हणून संतोष साठे, धीरज मंत्री, माजी सरपंच रमजान गौरे, माजी पंचायत समिती गजानन शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानदेव साठे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष विनोद तायडे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष शौकत पठाण, सुभाष तायडे, सेवानिवृत्त वनाधिकारी मधुकर तायडे, ग्रामपंचायत सदस्य अभिजित मेडशीकर, मूलचंद चव्हाण, जगदीश राठोड, अमोल तायडे, उल्हासराव घुगे, चंद्रकांत घुगे, गोरख भागवत, अजय चोथमल, सोयल पठाण, विठ्ठल भागवत, अजय वाकोडे, सचिन साठे, सुधाकर चोथमल यांची उपस्थिती होती.