अनसिंग येथे रमजान ईदमध्ये घडले हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 01:57 PM2018-06-16T13:57:34+5:302018-06-16T13:57:34+5:30
अनसिंग: मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईद उत्सवात दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदू-मुस्लिम बांधवांच्या एकतेचे दर्शन अनसिंग येथे घडले. गेल्या २० वर्षांपासून हा उत्सव हिंदू-मुस्लिम बांधव एकोप्याने साजरा करीत आहेत. ही परंपरा यंदाही अबाधित राहिली.

मुस्लिम बांधवांच्या रमजान ईदनिमित्त अनसिंग येथे दरवर्षी गावभर मिरवणूक काढण्यात येते. यंदाही सकाळीच ही मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत परिसरातील ३० खेडेगावांतील मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. यामध्ये हिंदू बांधवांचाही लक्षणीय सहभाग होता. गावातील बसस्थानक परिसरात असलेल्या मशिदीत मुस्लिम बांधवांनी एकत्रितपणे रमजान ईदनिमित्त नमाज अदा केली, तसेच एकमेकांना इदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी गावातील मान्यवर हिंदू बांधवांनी मशिदीजवळ मुस्लिम बांधवांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. चिमुकल्या मुलांनी रमजान ईदनिमित्त वडिलधाºयांसोबत मशिदीत नमाज अदा करीत वडिलधाºयांसह मित्रांना ईदीच्या शुभेच्छा दिल्या. हे चित्र रमजान ईद उत्सवाचे आकर्षण ठरले होते.