वाशिमात ‘हिंदूत्व’ मोटरसायकल रॅली उत्साहात!
By संतोष वानखडे | Published: January 23, 2024 04:31 PM2024-01-23T16:31:32+5:302024-01-23T16:38:24+5:30
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रम साजरे केले जातात.
वाशिम : हिंदूहृदयसम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्यावतीने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) २३ जानेवारी रोजी वाशिम शहरात ‘हिंदूत्व’ मोटरसायकल रॅली काढण्यात आली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रम साजरे केले जातात. याच दृष्टीने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी ‘हिंदूत्व’ मोटरसायकल रॅली काढण्यात आली. ही रॅली सकाळी ११:३० वाजता जिजाऊ निवासस्थान सिव्हिल लाईन येथून पोस्ट ऑफीस चौक, पुसद नाका, मन्नासिंह चौक, माहुरवेस, इंदिरा चौक, ध्रुव चौक, राजणी चौक, नगर परिषद चौक, दंडे चौक, टिळक चौक, सुभाष चौक, बालू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाटणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे जिजाऊ निवास्थान येथे येऊन या रॅलीचा समारोप झाला. रॅलीमध्ये सहभागी शिवसैनिकांच्या घोषणांनी रॅलीमार्ग दुमदुमून गेला होता. तसेच शिवसैनिकांनी बांधलेले भगवे फेटे व दुचाकीवरील भगवे झेंडे यामुळे हिंदूत्व रॅली प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत होती. या रॅलीचा समारोप जिजाऊ निवासस्थान सिव्हिल लाईन येथे करण्यात आला. तसेच यावेळी शिवसैनिकांना १ क्विंटल खिचडीचे वितरण करण्यात आले. ही मोटरसायकल रॅली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा समन्वयक सुरेश मापारी, जिल्हा संघटक गजाननराव देशमुख, कॅप्टन प्रशांत सुर्वे, शहर प्रमुख गजानन भांदुर्गे यांच्या नेतृत्त्वात काढण्यात आली.