मानोऱ्यातील नामाप्रच्या ७ आरक्षणामुळे इच्छूकांचा हिरमोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:17 AM2021-02-06T05:17:06+5:302021-02-06T05:17:06+5:30
तालुक्यात ११ डिसेंबर रोजी जाहीर महिला सरपंच आरक्षणात अभयखेडा, कोलार, वरोली आणि हिवरा बु. आणि गिर्डा या पाच ग्रामपंचायतीचे ...
तालुक्यात ११ डिसेंबर रोजी जाहीर महिला सरपंच आरक्षणात अभयखेडा, कोलार, वरोली आणि हिवरा बु. आणि गिर्डा या पाच ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जाती महिलांसाठी सरळ पद्धतीने राखीव करण्यात आले, तर ४ फेब्रुवारी रोजी जाहीर आरक्षणात अभयखेडा, कोलार, वरोली या तीन ग्रामपंचायतींचे आरक्षण सरळ पद्धतीने कायम ठेवून हिवरा बु. व गिर्डा ग्रामपंचायतीसाठी ईश्वर चिठ्ठीचा आधार घेण्यात आला. त्यात हिवरा बु.कडेच पूर्वीप्रमाणे आरक्षण कायम राहिले, तर गिर्डा ऐवजी एकलारा ग्रामपंचायतचे सरपंचपद महिला अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले. अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या आरक्षणात ११ डिसेंबर रोजी वटफळ, रुई, हिवरा खु., ढोणी, तळप बु, या ग्रामपंचायतीचे आरक्षण सरळपद्धतीने महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. आता ४ फेब्रुवारीच्या आरक्षण सोडतीतही हे आरक्षण कायम राहिले. नामाप्रच्या आरक्षण सोडतीत ११ डिसेंबर रोजी गोस्ता, अजनी, दापुरा खु, सिंगडोह, भोयणी, सोमठाणा, आमदरी, गिरोली, हळदा, या ग्रामपंचायत सरळ पद्धतीने महिला सरपंच पदासाठी आरक्षित करण्यात आल्या, तर ईश्वर चिठ्ठीत आसोला बु. आणि शेंदुरजना या ग्रामपंचायतीचे सरपंचपदही महिलांसाठी आरक्षित झाले होते. ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या सोडतीत यात बदल होऊन, भुली, पाळोदी, कारखेडा, तोरणाळा, चौसाळा, बोरव्हा, आसोला खु, या ग्रामपंचायतींचे सरपंपपद नामाप्र महिलांसाठी आरक्षित झाले. आसोला बु, गिरोली, हळदा, शेंदुरजना, आमदरी, सिंगडोह, भोयणी या ग्रामपंचायती महिला नामाप्र आरक्षणातून वगळण्यात आल्या.
------------
ईश्वरचिठ्ठीतही हिवरा बु. अ.जा महिलांसाठीच
अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला सरपंच पदासाठी ४ फेब्रुवारी रोजी जाहीर आरक्षणात पूर्वी निवड झालेल्या हिवरा बु. आणि गिर्डा या ग्रामपंचायतींकरीता ईश्वर चिठ्ठीचा आधार घेण्यात आला. यावेळी गिर्डा ऐवजी एकलारा ग्रामपंचायतचे सरपंच पद अनुसूचित महिलाकरीता आरक्षित झाले, तर हिवरा बु.मधील अनुसूचित महिला सरपंचाचे आरक्षण यातही कायम राहिले.