ऐतिहासिक तलावाची दुरवस्था

By admin | Published: December 15, 2014 12:50 AM2014-12-15T00:50:12+5:302014-12-15T00:56:41+5:30

सौंदर्यीकरणासाठी निधीची वानवा : तीन वर्षांपासून निधीचा प्रस्ताव थंड बस्त्यात.

Historical pond deterioration | ऐतिहासिक तलावाची दुरवस्था

ऐतिहासिक तलावाची दुरवस्था

Next

नाना देवळे / मंगरूळपीर (वाशिम)
शहरातील क्रमाक २ च्या नगरपालीका शाळेलगत असलेल्या ऐतिहासिक तलावाला सद्य:स्थितीत बकालपण आले आहे. उदासीन लोकप्रतिनिधी तथा नेभळट प्रशासनाच्या हलगर्जीमुळे सदर तलावाचे सौंदर्यीकरण रखडले आहे. मंगरुळपीरवासीयांमध्ये कमालीचा असंतोष खदखदत असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील मध्यवर्ती भागात हा पुरातन व ऐतिहासिक तलाव आहे. सदर तलावाचे खोलीकरण व सौदर्यीकरण करण्याची मागणी अनेक वेळा समोर आली आहे. अनेकांनी याबाबत नगरपालिकेकडे पाठपुरावाही केला आहे. परंतु, पालिकेच्या शासन, प्रशासनाला या महत्वपूर्ण बिषयाकडे लक्ष देण्यासाठी अद्याप मुहूर्त गवसलेला दिसत नाही. नगरपालिकेकडे पाठपुरावा करण्यात
गत सात वर्षापूर्वी शहरातील ग्रामीण रुग्णालयाजवळ असलेल्या जलकुंभातील पाण्याचा प्रवाह या तलावाकडे वळविण्यासाठी एका नालीचे खोदकाम करण्यात आले होते. त्यामुळे बांधकाम विभाग, महात्मा फुले गार्डन परिसरातील पावसाचे पाणी सरळ या नालीतून तलावात सोडण्याचा मार्ग सुकूर झाला होता; मात्र त्यानंतर माशी शिंकली. सदर तलावाचे खोलीकरण व सौदर्यीकरण्यात येईल, असे मौखिक आश्‍वासन तत्कालीन मुख्याधिकारी राठी मंगरूळपीरवासीयांना दिले होते. ाळाच्या ओघात दस्तुरखुद्द राठींपासून आतापर्यंत आलेले मुख्याधिकारी तलाव सौदर्यीकरणाची बाब सोयीस्करपणे विसरले आहेत. प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने खोदण्यात आलेली नाली सद्य:स्थितीत बुजली गेली आहे. हा तलाव पर्यावरणासह भूगर्भातील पाण्याची पातळी वाढीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे.
यावर्षी झालेल्या पावसामुळे हा तलाव पाण्याने तुडुंब असला असून, स्वाभाविकच या भागात असलेल्या विहीरीची व हातपंपाची पाण्याची पातळी वाढली आहे उल्लेखणीय बाब अशी की या तलावाखालील भागात असलेल्या दोन हातपंपामधून पाणी ओसडून वाहत आहे, या महत्त्वपूर्ण बाबीकडे लक्ष देउन या तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकरण केल्यास हा परिसर निसर्गरम्य व शहराच्या वैभवात भर पडेल. शहर विकास आराखडयात मुळ आरक्षणानुसार शहराची जलपातळी वाढविण्यासाठी पुरक असलेल्या तलावासाठीच आरक्षण कायम ठेवण्याची मागणी अमरावती विभागीय शिक्षण मंडळाचे सदस्य प्रा.अरुण इंगळे यांनी नगर पालीका प्रशासनाकडे केली आहे.

Web Title: Historical pond deterioration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.