इतिहास परिषदेची सुसंवाद सभा ऑनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:37 AM2021-04-03T04:37:45+5:302021-04-03T04:37:45+5:30
सभेला अध्यक्ष म्हणून अमरावती विभागीय अध्यक्ष प्रा. बालाजी लाभसेटवार, यवतमाळ हे होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून राज्य कार्यकारिणी कोषाध्यक्ष ...
सभेला अध्यक्ष म्हणून अमरावती विभागीय अध्यक्ष प्रा. बालाजी लाभसेटवार, यवतमाळ हे होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून राज्य कार्यकारिणी कोषाध्यक्ष प्रा. रंजन चौधरी यवतमाळ, प्रा. वसंत चव्हाण सदस्य यांनी मार्गदर्शन करुन विभागाच्या सदस्यांना परिषदेच्या विकास संघटन मजबूत करण्यासाठी सूचना दिल्या. ऑनलाईन सभेमध्ये प्रास्ताविक अमरावती विभागीय सचिव प्रा. दीपक अंबरते यांनी केले. तसेच ऑनलाईन मार्गदर्शन प्रा. श्रीधर जाधव, वाशिम, प्रा. गोवर्धन गावंडे, बुलढाणा, प्रा. गोपाल राठोड, अकोला, प्रा. भास्कर जाधव, प्रा. विरेंद्र मुरड, अमरावती, प्रा. गणेश लोहे, यवतमाळ, प्रा. राजेश तायडे, यवतमाळ, प्रा. रविकिरण मागे, वाशिम यांनी मार्गदर्शन केले. प्रा. संतोष सांगळे, बुलडाणा, प्रा. विठ्ठल पवार, अकोला, प्रा. कैलास निमसे, मुंबई हे उपस्थित होते. कनिष्ठ महाविद्यालयात इतिहास विषय हा स्पर्धा परीक्षांसाठी महत्वपूर्ण असून, एमएससी, युपीएससी, स्टाफ सिलेक्शन, रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड व इतर तयारी करणाऱ्या विद्यार्थांचा कल व ओढा वाढत आहे. त्या दृष्टिकोनातून आपण ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे नवनवीन शैक्षणिक साहित्य मुलांपर्यंत पोहोचवू शकतो व त्यांच्या ज्ञानामध्ये भर घालू शकतो, याविषयी या सुसंवाद सभेमध्ये विचारमंथन केले गेले. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डाॅ. प्रा. ज्ञानेश्वर भगत, अमरावती यांनी केले. प्रा. दीपक अंबरते, अमरावती यांनी आभार मानले.